टीव्ही जगताची प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या पती अभिनव शुक्लासोबत मालदीवमध्ये रोमँटिक क्षणांचा आनंद लुटत आहे. पती अभिनवचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रुबीना तिथे पोहोचली होती. अभिनव शुक्लाचा ३९ वा वाढदिवस २७ सप्टेंबर रोजी होता. या जोडप्याने त्यांच्या वाढदिवसाच्या सुट्टीसाठी मालदीवची निवड केली आहे. जिथून अभिनेत्री तिचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करत आहे आणि ती तिच्या चाहत्यांबरोबर इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आहे.
दरम्यान, रुबीनाने पुन्हा एकदा तिचा ग्लॅमरस आणि हॉट अवतार तिच्या चाहत्यांना दाखवला आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती कॅटवॉक करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये रुबीनाने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. तिचा ड्रेस इंडो वेस्टर्न आहे. ज्यात ती फ्लॉवर स्विल आणि हायनेक जाळीदार ब्लाऊज परिधान केला आहे. तिचे मोकळे केस वाऱ्यामुळे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करताना रुबीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कृपया वाट द्या.” रुबीनाच्या या व्हिडिओवर तिचा पती अभिनवने टाळ्या वाजवतानाची इमोजी पोस्ट केला आहे. एका तासात लाखो लोकांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे.
या व्हिडिओच्या अगोदरही रुबीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. बिकिनीपासून शॉर्ट ड्रेसपर्यंत रुबीनाने तिचा प्रत्येक लूक प्रेक्षकांना दाखवला आहे. रुबीना सोशल मीडियावर मजबूत फॅन फॉलोविंग कायम ठेवते. टीव्ही शो ‘छोटी बहू’ सीरियलमधून पदार्पण करणाऱ्या रुबीनाला ‘बिग बॉस १४’मध्ये चाहत्यांनी खूप पसंत केले आणि ती या पर्वाची विजेती ठरली होती.
तिचा शो ‘शक्ती’ ऑफ एअर पूर्ण झाला आहे. शूटिंग संपल्यानंतर अभिनेत्री सुट्टीवर गेली आहे. लवकरच ती ‘अर्ध’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. संगीतकार पलाश मुछल ‘अर्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सुरेखा कुडची तू इकुडची का तिकुडची’, वीकेंडला मांजरेकर घेणार सदस्यांची शाळा
-मल्हार अडकेल का अंतराच्या प्रेमात? योगिताचा नवीन लूक पाहून, चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा










