दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या अफवांवर पत्नी सायरा बानो यांची आगपाखड; म्हणाल्या, ‘सर्व काही…’

Saira Banu angry on Dilip Kumar'e death rumours


हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची रविवारपासून (6 जून) तब्येत ठीक नसल्याची बातमी येत आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या बातम्या यायला लागल्या, तेव्हापासून त्यांचा मृत्यू झाला आहे, अशा अफवा पसरत होत्या. या सगळ्या अफवा ऐकल्यानंतर दिलीप कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो या खूपच चिडल्या होत्या.

माध्यमातील वृत्तानुसार, सायरा बानो यांनी सांगितले की, “मागील काही दिवसांपासून दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पण त्यांची तब्येत आता पूर्णपणे ठीक आहे.” यातच दिलीप कुमार यांच्या मृत्यूची अफवा पसरल्या नंतर त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून एक ट्वीट केले आहे.

सायना बानो यांनी लिहिले आहे की, “व्हॉट्सऍपवर येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. सगळं काही ठीक आहे. तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल खूप धन्यवाद. डॉक्टरांच्या माहितीनुसार ते 2 किंवा 3 दिवसात घरी येणार आहेत.”

ईटाईम्सच्या‌‌ माहिती नुसार, आधी अशी माहिती समोर आली होती की, रविवारी दिलीप कुमार यांना ऑक्सिजनवर ठेवले आहे. डॉक्टरांनी अशी माहिती दिली होती की, दिलीप कुमार स्थिर आहेत. त्यांना आयसीयूमध्ये नेण्याची काहीही गरज नाहीये. त्यामुळे 2- 3 दिवसात त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची बातमी आली होती. या ट्विटमध्ये असे लिहिले होते की, “दिलीप कुमार यांना नॉन कोव्हिड रुग्णालयात रूटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घ्यायला थोडा त्रास होत आहे. पण डॉक्टर्स आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांची योग्य ती काळजी घेत आहे.”

दिलीप कुमार हे आजारी असल्याची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले होते. त्यावेळी कॅमेरामध्ये त्यांचे फोटो कैद झाले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. दिलीप कुमार यांचे चाहते ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.