समंथाने केला बॅकलेस ड्रेसमधील बोल्ड फोटो शेअर; चाहते तर सोडाच कलाकारांनीही केल्या भन्नाट कमेंट्स


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणून समंथा अक्किनेनीकडे पाहिलं जातं. समंथाने स्वत:ची आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती भलतीच चर्चेत आहे. ती आता फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नाही, तर संपूर्ण भारतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सुंदरतेचेही चाहते दीवाने आहेत. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. नुकताच तिने एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Actress Samantha Akkineni Bold Photo In Backless White Top Viral On Instagram)

समंथाने शनिवारी (३ जुलै) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस टॉप फोटोत दिसत आहे. तिच्या या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

समंथाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “त्या सर्व गोष्टींबद्दल विचार करा, ज्यांना तुम्ही पार केल्या आहेत, ज्या खूपच कठीण वाटत होत्या. मात्र, तुम्ही त्या पार केल्या आणि तुम्ही इथे आहात. तुम्ही एक सर्वायवर आहात.”

विशेष म्हणजे या फोटोला आतापर्यंत २२ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसं पाहिलं, तर समंथाने यापूर्वीही अनेक हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र, या फोटोची बातच न्यारी आहे. समंथाच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार या फोटोवर कमेंट करत तिची प्रशंसा करत आहेत.

रुहानी शर्माने कमेंट करत ‘स्टनर,’ असे म्हटले आहे, तर रकुलप्रीत सिंगने “उफ्फ!” अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केला आहे. दुसरीकडे उपासना कोनिडेलाने इमोजी शेअर केला आहे, तर सुष्मिता कोनिडेलाने “अगदी बरोबर आणि हा लूक खूप आवडला,” असे म्हटले आहे. यांसारख्या अनेक कलाकारांनी तिची प्रशंसा केली आहे.

समंथा नुकतीच मनोज वाजपेयी आणि प्रियामणिसोबत ‘द फॅमिली मॅन २’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. यामध्ये ‘राजी’ची नकारात्मक भूमिका साकारूनही तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. याव्यतिरिक्त समंथा लवकरच गुनाशेखरच्या ‘शकुंतलम’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात देवमोहन, अदिती बालन, मोहन बाबू आणि शिवान मल्होत्राही दिसणार आहेत.

हा चित्रपट महाकवी कालिदास यांच्या रचनेवर आधारित आहे. या चित्रपटाची शूटिंग याच वर्षी १५ मार्चपासून अन्नपूर्ण स्टुडिओमध्ये सुरू झाली होती. समंथाचे कॉस्च्युम बनवण्यासाठी नीता लुल्लाला कॉस्च्युम डिझायनर म्हणून निवडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाची शूटिंग स्थगित केली आहे. मात्र, जसे अनलॉक प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून या चित्रपटाची शूटिंग पुन्हा सुरू केली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.