Saturday, March 2, 2024

‘तुझे स्तन खूपच…’ बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणारे क्षेत्र म्हणून सिने जगताकडे पाहिले जाते. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अनेक अभिनेते तसेच अभिनेत्री प्रचंड मेहनत घेत असतात. मात्र या अभिनेत्रींना सिने जगतात काम मिळवण्यासाठी तितकाच संघर्ष करावा लागतो. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या सुडौल, हॉट फिगरला जास्त महत्व असते. त्यामुळे अभिनेत्रींना अनेकदा अपमानाचाही सामना करावा लागतो. असाच एक प्रसंग रागिणी एमएमएस चित्रपटातील अभिनेत्री संध्या मृदूलने सांगितला आहे. 

Sandhya-Mridul
Photo Courtesy: Instagram/sandymridul

संध्या मृदूलही (Sandhya Mrudul) बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. संध्या मृदुलने इंडस्ट्रीमध्ये बॉडी शेमिंगचा सामना करण्याबद्दल उघड केले आहे. हिंदुस्तान टाइम्स डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला की तिने काही भूमिकांसाठी ब्रेस्ट पॅड पॅडअप वापरले आहे.

संध्याने सांगितले की, “सुरुवातीच्या काळात मला माझ्या शरीराबद्दल अनेक सुचना ऐकाव्या लागल्या. एका निर्मात्याने मला ब्रेस्ट वाढवण्यासाठी सर्जरी करण्याचाही सल्ला दिला होता. पण मी याला नकार दिला. तुमच्यासाठी मी माझ्या शरीरात बदल करणार नसल्याचे सांगितले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandhya Mridul (@sandymridul)

याबद्दल पुढे बोलताना संध्या म्हणाली की, “एका निर्मात्याने मला सांगितले की आम्हाला तु आवडली आहेस, पण या भूमिकेसाठी तुझे बूब्स मोठे हवेत. मी त्यांना सर्जरी करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. शेवटी या भूमिकेसाठी मला ब्रेस्ट पॅड वापरावे लागले. त्यामुळेच पेज 3 आणि रागिणी एमएमएस 2 या चित्रपटांमध्ये मला ब्रेस्टपॅडचा वापर करावा लागला होता.” दरम्यान, संध्याने अल्पावधीतच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त मोठ्या पडद्यावरचं नव्हेतर तिच्या टेलिव्हिजनवरील भूमिकाही प्रचंड गाजल्या होत्या.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
दोन-दोन वेळा संसार थाटणारे मराठी कलाकार आहेत तरी कोण?

हे देखील वाचा