Friday, December 8, 2023

‘चलो अब बनकर पैनी धार’, गाण्यावर सपना चाैधरीने लावले ठुमके, व्हिडिओ व्हायरल

हरयाणवी डान्सर आणि अभिनेत्री सपना चौधरी इंटरनॅशनल आयकॉन बनली आहे. आपल्या डान्सने आणि गायिकिने तिने लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. आज सपना चौधरी एक मोठी सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी सपना सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधते. तिचे चाहते देखील तिच्या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. अशात सपनाने नुकतेच एक नवीन व्हिडिओ शेअर केले आहे, ज्यामध्ये ती परफॉर्म करताना दिसत आहे. खरे तर, सपनाने हरियाणवी गाण्यांवर डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मस्त नाचताना दिसत आहे.

अभिनेत्री सपना चाैधरी (sapna choudhary) हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘चलो अब बनकर पौनी धार’वर नाचताना दिसत आहे. डान्ससोबतच तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘चलो अब बनकर पौनी धार बनाओ खूब सारे रील्स.’  सपनाच्या या शैलीने नेहमीप्रमाणेच चाहत्यांचे लक्ष वेधले असून चाहते तिच्या या डान्स व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

सपनाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले की, ‘हे किती छान आहे.’, तर दुसर्‍या व्यक्तीने कमेंट करत लिहिले की, ‘अहो मॅडम, तुम्ही नाचताना खूप सुंदर दिसता.’ अशात एक चाहता अभिनेत्रीची प्रशंसा करत म्हणाला,  ‘हरियाणा गाण्याची सिंहीण’. अशाप्रकारे काही वेळातच सपनाच्या या डान्स व्हिडिओवर प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सपना चौधरीचेने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या गावातून केली होती, पण तिची मेहनत, संयम आणि कौशल्याच्या जोरावर तिने उत्कृष्ट काम केले आणि जगभरात लोकप्रियता मिळवली. सपनाने काही दिवसांपुर्वी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही हजेरी लावली होती आणि तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.(actress sapna choudhary haryanvi singer song viral video social media dance fans impressed )

अधिक वाचा
‘प्रेम जितकं जुनं होत जातं, तितकं… ‘, ‘आठवणी’चे पोस्टर रिलीज; ‘या’ दिवशी येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
‘पाकिस्तानचा जावाई आहे ताे, त्याला नारळ द्या अन्यथा…’, ‘गदर 2’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

हे देखील वाचा