Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

मेंढ्या चरवताना अन् ट्रॅक्टरवर विश्रांती घेताना दिसली सारा अली खान; चाहता म्हणाला, ‘आमची देसी क्वीन!’

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते. सोशल मीडियावरूनन ती आपल्या नवनवीन पोस्ट नेहमी शेअर करत असते. तिचे चाहतेही तिच्या प्रत्येक गोष्टीला भरभरून पसंती दर्शवत असतात. परंतु साराची निरागसता तिच्या चाहत्यांना सगळ्यात जास्त आवडते. आता पुन्हा एकदा सारा अली खानने आपल्या निरागसतेने चाहत्यांची मने जिंकली आहेत. साराने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा खोडकरपणा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हे व्हायरल होत असलेले फोटो साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये ती एका गावामध्ये असल्याचे दिसते. या फोटोमध्ये ती कधी बकऱ्या चरायला नेताना, तर कधी ट्रॅक्टरवर आराम करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये ती गावातील एका व्यक्तीसोबतही दिसून येत आहे. या सुंदर फोटोंमध्ये सारा ज्याप्रकारे आनंद घेत आहे, ते पाहून चाहते तिचे भरभरून कौतूक करत आहेत. या फोटोंसोबत साराने “मेंढी चरवणे, ट्रॅक्टर चालवणे, हे फक्त फोटोचे निमित्त होते का? की, साराला हे जग वेगळं वाटतंय?,” अशा आशयाचे कॅप्शनही लिहिले आहे.

अनेकदा सारा अली खान (Sara Ali Khan) मजेशीर कविता म्हणताना दिसते, ज्या तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. अशातच तिचे हे कॅप्शनसुद्धा एखाद्या कवितेसारखचं वाटत आहे. साराच्या या पोस्टवर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने यावर प्रतिक्रिया देताना “हमारी देसी क्वीन,” अशी सुंदर उपमा दिली आहे. या व्हायरल फोटोला आतापर्यंत ९ लाख ५० हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

साराने २०१८ मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही, परंतु सारा अली खानचे या चित्रपटातील काम प्रेक्षकांना आवडले. साराने तिच्या पहिल्याच चित्रपटातून चित्रपट जगतात वेगळे स्थान निर्माण केले. नुकतीच ती आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि धनुषसोबत मुख्य भूमिकेत आहे.

हे देखील वाचा