Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

विमानतळावर शाहरुखच्या लेकीला पाहून मुलांनी का लपवलं तोंड? सोशल मीडियावर होतेय चर्चा

बॉलिवूड कलाकारांची मुलं स्टारकिड म्हणून ओळखळी जातात. यामध्ये सुपरस्टार शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान हिचाही समावेश होतो. ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. शाहरुख खान याच्याप्रमाणेच सुहानाचाही मोठा चाहतावर्ग आहे. सुहानाला इंस्टाग्रामवर जवळपास 30 लाख चाहते फॉलो करतात. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकताच सुहानाचा विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती नेहमीप्रमाणेच डॅशिंग अंदाजात दिसली. या व्हिडिओत तिच्या मागे काही मुलं होती, ज्यांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.

झाले असे की, सोशल मीडियावर सुहाना खान (Suhana Khan) हिचा एक व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या व्हिडिओत सुहाना विमानतळावरून (Suhana Airport Video) बाहेर येताना दिसत आहे. व्हिडिओत दिसते की, सुहाना बॅगी डेनिमसोबत राखाडी रंगाच्या हुडी आणि मास्कमध्ये आहे. या व्हिडिओत सुहाना तिच्या धुंदीत चालताना दिसत आहे. यादरम्यान तिच्या मागे काही मुलेही चालत असतात. जेव्हा सुहाना मागे वळून पाहते, तेव्हा ती सर्व मुलं लाजून आपले तोंड लपवतात. सोशल मीडियावर मुलांच्या या कृत्यावर नेटकरी त्यांची चांगलीच मजा घेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओवर कमेंट्सचा महापूर
सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडिओवर अनेक लोकांनी कमेंट करून विचारले की, मुलं त्यांचे तोंड का लपवत आहेत. एका युजरने लिहिले की, “मागील मुलगा का लाजला?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “मागे तर पाहा.” अशाप्रकारे आणखी एकाने लिहिले की, “तिने मागे वळून पाहताच मुलं लाजली.” या सर्वांमध्ये एका युजरने लिहिले की, “ती मुलं कशी वागत आहेत. विमानतळावर स्टारच्या मुलीला इतकी सुरक्षा असूनही असे घडतंय. आम्ही रस्त्यावर महिला आणि मुलींच्या सुरक्षेची अपेक्षा कशी करू शकतो?”

सुहानाचा सिनेमा
सुहाना खान हिच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘द आर्चीज’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन फरहान अख्तर याची बहीण झोया अख्तर करत आहे. तसेच, या सिनेमात सुहाना खानव्यतिरिक्त अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. (Actress Shahrukh Khan daughter Suhana Khan spotted at airport see video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्दर्शकाच्या ‘त्या’ एका निर्णयाने मोडली होती राजेश खन्ना आणि अमोल पालेकरांची जुनी मैत्री, वाचा सविस्तर
रणबीर अन् आलियाने लेकीचे ठेवले खास नाव, आजी नीतू कपूर झाल्या भावूक

हे देखील वाचा