बिग बॉसचे घर म्हणजे युद्धाचे मैदान आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण इथे रोज काहीतरी होतच असते. एवढ्या पर्वांमधे मोठं-मोठ्या वादांशिवाय, भांडणांशिवाय एकही भाग आजपर्यंत प्रदर्शित झाला नाहीये. मतभेद असल्यामुळे, स्वभावांमुळे आणि शेवटी कोणत्यातरी एका चुकीमुळे स्पर्धकांमध्ये सतत वाद होत असतात. कोणाला समजायच्या आतच या वादांचे रूपांतर मोठ्या भांडणात होते. सध्या बिग बॉसचे १५ वी पर्व नेहमी होणाऱ्या भांडणामुळे जास्त गाजताना दिसत आहे.
बिग बॉस १५ च्या घरात नुकतीच टेलिव्हिजन अभिनेत्री असलेल्या देवोलीना भट्टचार्यने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. देवोलीनाने एन्ट्री घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच तिने शमिता शेट्टीला टार्गेट करायला सुरुवात करत तिला सतत बोल लावताना दिसली. होस्ट सलमान खानने देखील देवोलीनाला तिच्या वागण्यावरून हटकले आणि तिला तिचा गेम खेळत शमिताला टार्गेट न करण्यास सांगितले आहे. मात्र देवोलीना काही ऐकायचे नाव घेत नाहीये.
यादरम्यान नुकतेच देवोलीना आणि शमितामध्ये जोरदार भांडण झाले. हे भांडण सुरू असताना शमिता अचानक बेशुद्ध झाली. शमिताला पाहून सर्वच घरातील सदस्य घाबरले आणि करण कुंद्राने तिला उचलून घेत मेडिकल रूमकडे धाव घेतली. लवकरच हा भाग प्रसारित केला जाणार आहे. सध्या या भागाचा प्रोमो कलर्स चॅनेलने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून, तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या घरात बिग बॉस जिंकल्यानंतर मिळणाऱ्या प्राईज मनीवरून घरात एक टास्क रंगत आहे. या टास्कची संचालक देवोलीना आणि शमिता असून, टास्कच्या सुरुवातीपासूनच देवोलीना नॉन व्हीआयपी सदस्यांच्या विरोधात पक्षपाती होत उघडपणे चीटिंग करताना दिसत आहे. यातच देवोलीनाने चुकीचा निर्णय घेत उमर रियाजला बाहेर केले. इतर सदस्यांसोबत देखील ती उघडपणे चीटिंग करत आहे. याच कारणामुळे नॉन व्हीआयपी सदस्यांची प्राईज मनी ५ लाखांनी कमी झाली आहे. यावरूनच देवोलीना आणि शमितामध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यांच्यातल्या वादाचे रूप एका वेगळ्याच पातळीवर पोहचले आहे.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की शमिता आणि देवोलीनामध्ये भांडण होत आहे. शमिता असे काही बोलते ज्यामुळे देवोलिना अधिक चिडते आणि ती जोरजोरात ओरडायला सुरुवात करते. भांडण चालू असताना शमिताची तब्येत बिघडते आणि ती बेशुद्ध होते. पुढे काय होते यासाठी बिग बॉस पाहावेच लागेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–टेलिव्हिजन विश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी निवडला दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असणारा जोडीदार
–लग्नाच्या नुसत्या नावाने देखील चिडायची काजोल, मात्र अजयला भेटल्यानंतर बदलले विचार










