शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा पूर्वाश्रमीच्या पत्नीबाबत हैराण करणारा खुलासा; म्हणाला, ‘माझ्या बहिणीच्या पतीसोबत…’

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा होय. व्यावसायिक असलेला राज आधीपासूनच विवाहित होता. त्याच्या पत्नीचे नाव कविता कुंद्रा असे आहे. राज आणि तिच्या घटस्फोटामागील कारण शिल्पा शेट्टी असल्याचे तिने सांगितले होते. मात्र, आता राज कुंद्राने नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा करत पूर्वाश्रमीच्या पत्नीने लावलेले ते आरोप फेटाळले आणि अनेक हैराण करणारे खुलासे केले आहेत. यासोबतच त्याने लग्न मोडण्याचे खरे कारणही सांगितले आहे.

खुलासा करत राजने म्हटले आहे की, “जेव्हा आम्ही लंडनमध्ये राहत होतो, तेव्हा माझी पूर्वाश्रमीची पत्नी कविताचे माझ्या बहिणीच्या पतीसोबत अफेअर चालू होते.”

कविताचे यूकेमध्ये सुरू होते अफेअर
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्राने आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबाबत बोलताना सांगितले की, “माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे. ती माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींसोबत भांडत होती. आम्ही एकाच घरात राहत होतो. आई- बाबा, बहीण आणि तिचा पती. कारण ते तेव्हाच भारतातून यूकेला स्थायिक झाले होते. यादरम्यान कविता माझ्या बहिणीच्या पतीच्या जवळ आली होती. त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवत होती. विशेषत: तेव्हा, जेव्हा मी बिझनेस ट्रिपमुळे बाहेर जात असायचो. कुटुंबातील अनेक लोकांनी इतकेच नव्हे, तर माझ्या ड्रायव्हरनेदेखील सांगितले होते की, दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. परंतु मी कोणाच्याही गोष्टींवर लक्ष देत नव्हतो. दोन्ही कुटुंब खुश राहण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करायचो.”

माझ्या बहिणीने घेतला होता भारतात परतण्याचा निर्णय
तो पुढे बोलताना म्हणाला की, “माझा मेहुणा आणि माझी पूर्वाश्रमीची पत्नी सोबतच कामावर जायचे. सोबतच एका खोलीत बसायचे. त्यावेळी माझ्या बहिणीला वाटले की, भारतात गेले पाहिजे. कारण आमच्या घरात एकत्र राहिल्याने सर्वकाही बिघडत होते. कोणतेच काम व्यवस्थित होत नव्हते. यानंतर माझी बहीण आणि तिचा पती भारतात परतले. मात्र, तेव्हाही गोष्टी सुरळीत झाल्या नाहीत. कारण कविता आणि माझ्या मेहुण्यामध्ये खूप बोलणं व्हायचं. कविता आपला सर्वाधिक वेळ बाथरूममध्ये घालवू लागली होती.”

बाथरूमममधून मिळाला होता कविताचा सिक्रेट सेलफोन
“यानंतर मला बाथरूममधून एक सिक्रेट सेलफोन मिळाला होता. त्या फोनवरून अनेक मेसेज मला मिळाले, जे तिने माझ्या बहिणीच्या पतीला केले होते. त्यामुळे माझे हृदय तुटले होते. मी खूप रडलो होतो आणि हा विचार केला की, मी असे काय केले आहे, ज्यामुळे माझ्यासोबत असे झाले. मी आपल्या गरोदर बहिणीला सांगितले की, तो नंबर माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचा आहे. मी तिला तिच्या घरी सोडून येईल आणि हे सर्व संपवतो. ती स्वत: ठरवेल तिला काय करायचं आहे. माझी बहीण गरोदर होती आणि हे ऐकून तिचेही मन तुटले होते,” असेही त्याने पुढे सांगितले.

https://www.instagram.com/p/CP15-g7Byti/?utm_source=ig_web_copy_link

४० दिवसांच्या मुलीला सोडणे कठीण झाले होते
पुढे बोलताना तो म्हणाला की, “बहिणीने म्हटले की, तिला आता तिच्या पतीसोबत राहायचे नाही. त्यावेळी मी तिला समजावून सांगितले की, असे वाग जसे काही झालेच नाही आणि माझी पूर्वाश्रमीची पत्नी घरी जाण्याची तयारी करत आहे. मी भारतात गेलो आणि आपली बहीण आणि तिच्या मुलांना घेऊन आलो. तसेच पूर्वाश्रमीच्या पत्नीला तिच्या घरी सोडले. खरं तर ती त्यावेळी गरोदर होती आणि रिवाजाच्या निमित्ताने ज्यात बाळ जन्मल्यानंतर मुलगी आपल्या माहेरी जाते. ती शेवटची वेळ होती, जेव्हा मी तिला आणि आपल्या मुलीला सोडले होते. आपल्या ४० दिवसांच्या मुलीला सोडणे माझ्यासाठी सर्वात कठीण होते.”

https://www.instagram.com/p/CLqH68LgKx0/?utm_source=ig_web_copy_link

कविताने शिल्पावर लावले होते लग्न मोडल्याचे आरोप
डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत कविताने म्हटले होते की, “मी शिल्पा आणि राज यांचे फोटो पाहते आणि विचार करते की, ती माझ्या पतीसोबत आहे. ती माझे आयुष्य जगत आहे. एकीकडे मी आपले लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे माझ्या पतीचे तिच्यासोबत अफेअर सुरू झाले होते. माझा पती केवळ शिल्पाबद्दलच चर्चा करत होता. यानंतर त्याने मला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली आणि त्यावेळी मी त्याला विचारले की, तू दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार आहे का? यावर तो काहीच बोलला नाही.”

राज आणि शिल्पाचे लग्न
राज आणि कविताने सन २००३ मध्ये लग्न केले होते. यानंतर त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याने त्यांनी सन २००६ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर राजने सन २००९ साली शिल्पासोबत आपला संसार थाटला. त्यांना दोन मुलेही आहेत. त्यांचे नाव समिशा आणि वियान आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या चिमुकलीला ओळखलं का? आज तिच्या ‘कॉमिक टायमिंग’साठी आहे प्रसिद्ध; तर प्रेक्षकांना पोट धरून हसायला पाडते भाग

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

Latest Post