सोफिया हयातवर अभिनव शुक्लासोबत ‘सेक्‍शुअल रिलेशन’चा आरोप; ट्रोलर्सने म्हटले ‘पॉर्नस्टार’


सोफिया हयात नाव ओळखीचे वाटले ना? वाटणारंच. मॉडेल असणारी सोफिया नेहमी वादांमध्येच अडकलेली असते. कधी तिच्या फोटोंमुळे, कधी व्यक्तव्यांमुळे, तर कधी तिच्या रिलेशनशिपमुळे. वाद आणि सोफिया यांचे अतिशय जुने नाते असावे असे प्रत्येकालाच वाटत असेल. मागच्या काही दिवसांपासून गायब असणारी सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

‘बिग बॉस’ फेम सोफिया हयात आता तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे प्रकाशझोतात आली आहे. नुकतीच सोफियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत तिने तिला आलेल्या एका मेसेजचा स्क्रीनशॉट देखील पोस्ट केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये तिला एका मुलीने मेसेज केला असून त्यात तिचे आणि अभिनेता अभिनव शुक्लाचे ‘सेक्‍शुअल रिलेशन’ असल्याचे सांगितले आहे.

सोफियाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “कोणीतरी मला मेसेज केला आहे. खरंतर माझीच चूक आहे. मी माझे मेसेजेस कधीच बघत नाही. मात्र, ती महिला मला सतत मेसेज करत होती आणि मदत मागत होती. काही वेळाने मला ती महिला खोटी असल्याचे जाणवले, आणि मी तिला ब्लॉक केले. पण तिने दुसरे अकाऊंट तयार केले आणि पुन्हा मला मेसेज करायला सुरुवात केली.”

पुढे सोफियाने लिहिले, “अशा लोकांपासून कधीच आपण घाबरायला नको. ट्रोल करणारे लोकं स्वतः आतून उदास असतात. जेव्हा मला असे मेसेज मिळतात, तेव्हा मी त्या लोकांसाठी नेहमी दुखी होते जे स्वतः बद्दल नेहमी घृणा जाणवतात. ट्रोल करणारी लोकं कधीच आपल्याला नुकसान पोहोचवू शकत नाही.”

यासोबतच तिने तिचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला असून त्यात तिने म्हटले आहे की, ती अभिनवला ओळखत नाही. त्याला ती भेटली देखील नाहीये.

सोफियाला मेसेज केलेल्या महिलेने लिहिले आहे की, “मला तुझ्या आणि अभिनव शुक्लच्या नात्याबद्दल सर्व काही माहित आहे. त्याने तुझा फक्त वापर करून घेतला आहे. मी तुझ्या वन नाईट पार्टनर आणि तुझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे. मी रोज प्रार्थना करते की, तुझे आई- वडील वडील लवकर मारावे. मी तुला जेलमध्ये बघू इच्छिते वैश्या. तुझ्या आई- वडिलांना लाज वाटली पाहिजे की त्यांनी तुझ्यासारख्या निर्लज्ज पॉर्न स्टारला जन्म दिला.”

सोफियाने ‘अक्सर २’, ‘कॅश एँड करी’, ‘नचले लंडन’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आशुतोष पत्कीने शेअर केला जिममधला फोटो; पाहायला मिळाला बबड्याचा ‘फिट ऍंड फाईन’ लूक

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’


Leave A Reply

Your email address will not be published.