Friday, April 26, 2024

‘महाराष्ट्राची अप्सरा’, म्हणत सोनाली कुलकर्णीच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

अनेक चित्रपट,‌‌ नाटक आणि डान्स करून नावारूपाला आलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी चाहते आहेत. आजकाल तर तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. आयुष्यातील प्रत्येक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या निरनिराळ्या स्टाईलचे दर्शन आपल्याला इथून मागे झालेच आहे. अशातच तिचा एक स्टायलिश लूक समोर आला आहे.

सोनालीने सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच लाजवाब दिसत आहे. तसं पाहायला गेलं तर सोनालीला कोणताही पोशाख अगदी शोभून दिसतो. परंतु या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. आपण पाहू शकतो की, सोनालीने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला आहे. यासोबत तिने गळ्यात डायमंड ज्वेलरी आणि इअरींग घातले आहेत. तसेच सगळे केस मागे बांधलेले दिसत आहेत. सोनाली मागील काही दिवसापासून पीएनजी ज्वेलर्सची जाहिरात करत आहे. त्यासाठीच तिने हे दागिने घालून फोटोशूट केले आहे. काही दिवसापूर्वी तिने सोन्याचे दागिने घालून फोटोशूट केले होते. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (actress sonalee kulkarni share her beautiful photos on social media)

तिच्या चाहत्यांना देखील हा लूक खूप भावला आहे. सोनालीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. या फोटोला देखील चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “महाराष्ट्राची अप्सरा,” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

https://www.instagram.com/p/CVMtU6aNhx7/?utm_medium=copy_link

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोश्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आमची गुळाची ढेप’, म्हणत प्राजक्ता माळीच्या गोड स्माईलचे आणि सौंदर्याचे होते तोंडभरून कौतुक

-आकाशी रंगाच्या साडीमध्ये ‘परमसुंदरी’ दिसणाऱ्या मिथिला पालकरचे फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

-‘गुलाबी गुलाब’ झालेल्या प्रिया बापटला पाहून हरपले चाहत्यांचे भान

हे देखील वाचा