Thursday, November 30, 2023

काय सांगता! ‘या’ क्रिकेटरला करायचे होते सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली बेंद्रेशी लग्न

सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) 26 वर्षांपूर्वी 1994 मध्ये आलेल्या ‘आग’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत गोविंदा आणि शिल्पा शेट्टीही होते. तसे पाहता, सोनाली तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिली. राज ठाकरेंचे तिच्यावरील प्रेम असो किंवा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरचा प्रस्ताव असो, सोनाली अनेकदा चर्चेत राहिली. एवढेच नाही, तर सुनील शेट्टीही तिच्या प्रेमात वेडा झाला होता. सोनाली रविवारी(1 जानेवारी) तिचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे.

सोनालीचा जन्म 1 जानेवारी 19975 रोजी मुंबईत झाला. काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर राजकारणी राज ठाकरे यांना सोनाली बेंद्रे आवडू लागली. दोघेही एकमेकांना आवडू लागले. त्यावेळी राज ठाकरे यांचे लग्न झाले होते. विवाहित असूनही राज ठाकरेंना सोनालीशी लग्न करायचे होते. त्यांचे वडील आणि शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांना हे कळताच त्यांनी दोघांच्या लग्नाला स्पष्ट नकार दिला होता.

एवढेच नाही, तर पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरही सोनालीच्या प्रेमात पडला होता. सोनालीसोबत त्याची पहिली भेट पाकिस्तानी संघाच्या भारत दौऱ्यादरम्यान झाली होती. शोएब पहिल्याच नजरेत सोनालीच्या प्रेमात पडला होता.

तसे, सोनाली बेंद्रेसोबतच्या पहिल्या भेटीपूर्वीच, शोएबला तिला चित्रपटात पाहिल्यानंतर ती आवडू लागली होती. ‘इंग्लिश बाबू देसी मॅम’ या चित्रपटात शोएबने सोनालीला पहिल्यांदा पाहिले. शोएबची सोनालीबद्दलची आवड इतकी वाढली होती की, तो त्याच्या पर्समध्ये तिचा फोटो घेऊन फिरायचा.

एका मुलाखतीदरम्यान शोएब अख्तरने सांगितले होते की, तो सोनालीच्या प्रेमात आहे. जर तिने त्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर तो तिचे अपहरण करेल. जेव्हा सोनालीला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, “मी शोएब अख्तर नावाच्या कोणत्याही क्रिकेटरला ओळखत नाही आणि मला क्रिकेटमध्ये रस नाही.”

सोनाली बेंद्रेने 1995 मध्ये सुनील शेट्टीसोबत ‘टक्कर’ चित्रपटात काम केले होते. ‘आँखो में बेस हो तुम… ‘ हे चित्रपटातील गाणे खूप गाजले. चित्रपटात काम करत असताना सुनील शेट्टी सेटवरच सोनालीवर प्रेम करू लागला. मात्र, ही बाब सुनील शेट्टीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी सोनालीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली. त्यावेळी सुनील शेट्टीचे लग्न झाले होते.

सोनालीने नंतर 2002 मध्ये निर्माता गोल्डी बहलशी लग्न केले. गोल्डी बहलची सोनालीशी पहिली भेट 1994 मध्ये चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या दोघांची पहिली भेट गोल्डी बहलची बहीण सृष्टी आर्य हिने केली होती. सृष्टी आर्य सोनालीची चांगली मैत्रीण होती. या भेटीत गोल्डीने सोनालीच्या हळू खाण्याच्या सवयीबद्दल काही भाष्य केले. यामुळे तिला राग आला, मात्र इथून पुढे दोघांमध्ये बोलणे सुरू झाले.

त्यावेळी सोनाली अमिताभ बच्चन यांच्या ‘मेजर साब’ या चित्रपटात काम करत होती. अमिताभ यांचा मुलगा अभिषेक वडिलांना भेटायला सेटवर यायचा. गोल्डी आणि अभिषेक चांगले मित्र असल्याने अभिषेकसोबत गोल्डीही सोनालीला भेटायला जायचा.

हळूहळू या तिघांनी बाहेर पडायला सुरुवात केली आणि सुदैवाने गोल्डी बहल सोनालीचा पुढचा चित्रपट ‘अंगारे’ प्रोड्यूस करत होता. एक दिवस या चित्रपटाच्या सेटवर पार्टी सुरू होती. अभिषेकने हिंमत वाढवल्यानंतर अखेर गोल्डीने सोनालीला प्रपोज केले आणि तिने होकारही दिला.

या शूटिंग सेटच्या आठवणींना उजाळा देताना सोनालीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “तो अनेकदा माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होता. तो खूप गोंडस होता. आम्ही मित्र झालो आणि जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले.” यानंतर 12 नोव्हेंबर 2002 रोजी दोघांनी लग्न केले. सोनालीने ऑगस्ट 2005 मध्ये मुलगा रणवीरला जन्म दिला.

सोनालीने 1990ते 2000 पर्यंत चित्रपटांमध्ये काम केले. तिने ‘दिलजले’ (1996), ‘तराजू’ (1997), ‘मेजर साब’ (1998), ‘हम साथ-साथ है’ (1999), ‘हमारा दिल आपके पास है’ (2000), ‘तेरा मेरा साथ’ असे चित्रपट केले. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती शेवटची 2013 मध्ये ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटात दिसली होती.(sonali bendre birthday and her life interesting facts)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘तिरंगा’ चित्रपटासाठी नानांनी दिला होता नकार; मात्र नंतर ‘ही’ विचित्र अट सांगत भरली त्यांनी हामी

आमिर खानसोबत ‘सरफरोश’ चित्रपटात दिसली होती सोनाली बेंद्रे, मात्र आजही होतो ‘याचा’ पश्चात्ताप

हे देखील वाचा