Wednesday, June 26, 2024

श्रीदेवी नव्हती देत बोनी कपूर यांना भाव, मग अशी लढवली शक्कल; आपल्यापेक्षा 8 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत थाटला संसार

‘लव्हस्टोरी’… हे ऐकल्यानंतर किती भारी वाटतं नाही का. ‘धर्मेंद्र- हेमा मालिनी’पासून ते ‘अभिषेक- ऐश्वर्या राय बच्चन’पर्यंत जवळपास सर्वच बॉलिवूडधील लव्हस्टोरींबद्दल कदाचित चाहत्यांना माहिती असेल. यातीलच एक लव्हस्टोरी म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी ‘चांदनी’ची. म्हणजेच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची. आज या लेखात आपण या जोडीच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

लव्हस्टोरी
सन 1979 मध्ये ‘सोलवा सावन’ या चित्रपटातून श्रीदेवीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. असे म्हटले जाते की, याच चित्रपटात श्रीदेवीला पाहून बोनी तिच्यावर प्रेम करू लागले होते. परंतु त्यावेळी हे एकतर्फी प्रेम होते, जे बोनी यांच्याकडून होते. या दोघांचेही प्रेम ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटादरम्यान दिसून आले. सन 1970 च्या दशकात जेव्हा श्रीदेवी तमिळ चित्रपटात काम करत होती, तेव्हा बोनी तिला भेटायला चेन्नईला रवाना झाले होते. परंतु श्रीदेवी शूटिंगच्या कामानिमित्त बाहेर गेली होती, त्यामुळे तिची भेट होऊ शकली नव्हती.

बोनी आणि श्रीदेवी यांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. बोनी यांनी आधीच श्रीदेवीला प्रपोज केले होते. परंतु त्यावेळी श्रीदेवी त्यांना भाव देत नसायची. त्यावेळी बोनी हे आपला लहान भाऊ अनिल कपूरसोबत ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटात त्यांना श्रीदेवीला नायिका म्हणून घ्यायचे होते. परंतु त्यांना मार्ग सापडत नव्हता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

श्रीदेवीच्या आईने केली होती 10 लाख रुपयांची मागणी
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या प्रेम- कहाणीमध्ये अनेक चढ- उतार होते. बोनी यांनी श्रीदेवीच्या आईशी संपर्क साधला. श्रीदेवीच्या आईने जास्त रुपयांची मागणी केली होती. बोनी कपूर तेवढे रुपये देण्यासाठी तयार झाले आणि अशाप्रकारे श्रीदेवीने या चित्रपटात काम केले. एकवेळ अशी आली की, जेव्हा श्रीदेवीची आई आजारी पडली आणि त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार घेण्यात आला होता, तेव्हा बोनी यांनी त्या कठीण काळात श्रीदेवीला साथ दिली होती.

याबाबत बोनी यांनी एका मुलाखतीत हे स्वीकारले होते की, लग्नाच्या आधीपासून श्रीदेवी त्यांना आवडत होती. ते म्हणाले होते की, ‘मिस्टर इंडिया’ (1987) चित्रपटासाठी श्रीदेवीला इंप्रेस करण्यासाठी त्यांनी तिने सांगितलेल्या किंमतीपेक्षाही जास्त रक्कम दिली होती. त्यांनी पुढे असेही सांगितले होते की, श्रीदेवीच्या आईने चित्रपटासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी श्रीदेवीचं तर सोडाच, कोणत्याही अभिनेत्रीला एका चित्रपटासाठी इतके जास्त पैसे मिळत नसायचे. तरीही, ते 11 लाख रुपये देण्यासाठी तयार झाले होते.

8 वर्षे लहान असलेल्या श्रीदेवीसोबत केले लग्न
असे म्हटले जाते की, श्रीदेवीची आई आजारी असताना आणि त्यांच्या मृत्यूदरम्यान बोनी आणि श्रीदेवी यांच्यातील जवळीक वाढली. अशाप्रकारे त्यांचे नाते सहानुभूतीने सुरू झाले आणि प्रेमात बदलले. बोनी कपूर यांनी आपल्यापेक्षा वयाने 8 वर्षे लहान असलेल्या श्रीदेवीला प्रपोज केले होते. दोघांचेही लग्न खासगी ठेवले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

दोघांचेही झाले होते लग्न
बोनी कपूर यांचे पहिले लग्न मोनी शौरी कपूरसोबत झाले होते. मोना आणि बोनी यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर असे दोन अपत्य आहेत. जसे बोनी कपूर आधी लग्न झाले होते, तसेच श्रीदेवीचेही आधी लग्न झाले होते. खरं तर श्रीदेवीने ‘डिस्को डान्सर’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते ‘मिथुन चक्रवर्ती’ यांच्याशी 1985 मध्ये लग्न केले होते.

सन 1996 मध्ये मोनाला घटस्फोट देऊन बोनी यांनी श्रीदेवीशी लग्न केले होते. श्रीदेवी आणि बोनी यांना दोन मुली आहेत. त्यांचे नाव जान्हवी आणि खुशी कपूर आहे. असे म्हटले जाते की, बोनी यांच्याशी लग्न करताना श्रीदेवी गरोदर होती.

दिनांक 24 फेब्रुवारी, 2018 रोजी श्रीदेवीने जगाचा निरोप घेत आपल्या पतीसह सर्व सिनेजगताला मोठा धक्का दिला होता. सध्या बोनी आपल्या दोन्ही मुलींसोबत राहतात.(actress sridevi boney kapoor love story boney kapoor was crazy about sridevi)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
देवदूताच्या रुपात आली होती श्रीदेवी; एका निर्णयाने बदलले चित्रपट निर्मात्याचे आयुष्य
दादासाहेब फाळके पुरस्कार: आलिया, रणबीर ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार, ‘हा’ सिनेमा ठरला बेस्ट जाणून घ्या विजेत्यांची नावे

हे देखील वाचा