‘मला पकडून दाखवा’, म्हणत सनी लिओनीने केला भर पावसात सायकल चालवतानाचा व्हिडिओ शेअर


बॉलिवूडमध्ये अनेक ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. मात्र, या सर्वांमध्ये एक अभिनेत्री अशी आहे, जिने आपल्या मेहनतीवर आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अभिनेत्री इतर कोणी नव्हे, तर सनी लिओनी आहे. सनीचा आपला एक जबरदस्त चाहतावर्ग आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा वावर असतो. ती नेहमीच आपल्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच आता तिने नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या भलताच चर्चेत आहे. कदाचित यापूर्वी तुम्ही सनीला अशाप्रकारे कधीही पाहिले नसेल. (Actress Sunny Leone Goes Cycling With Husband Daniel Weber Video Viral)

खरं तर सनीने अधिकृत इंस्टाग्रामवर आपले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. सुरुवातीच्या दोन फोटोंमध्ये ती सायकलवर बसलेली दिसत आहे, तर दुसरीकडे एका व्हिडिओत ती भर पावसात रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. तिच्यासोबत या व्हिडिओमध्ये पती डॅनियल वेबरही दिसत आहे.

सनीच्या या लेटेस्ट व्हिडिओवर चाहते जीव ओवाळून टाकत आहेत. तसेच लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सनीने लिहिले की, “शक्य असेल तर मला पकडून दाखवा.” यासोबतच तिने हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे.

सनीच्या या पोस्टला आतापर्यंत ७ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका युजरने सनीची मजा करत लिहिले की, “नक्की पकडू… लोकेशनतर सांग.” अशाप्रकारे नेटकरी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत आहेत.

नुकतेच सनीचा आणखी एख व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती जहाजेवर बसून ग्लॅमरस अंदाजात पोझ देत होती.

सनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर तिने सन २०१२ मध्ये ‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने ‘जॅकपॉट’, ‘वन नाईट स्टँड’, ‘द व्हर्जिनिटी हिट’, ‘रागिनी एमएमएस २’, ‘बेईमान लव्ह’, ‘एक पहेली लीला’, ‘शूटआऊट ऍट वडाला’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तिचे ‘बेबी डॉल’ हे गाणे खूप गाजले. त्यानंतर तिला ‘बेबी डॉल’ म्हणून ओळख मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’

‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


Leave A Reply

Your email address will not be published.