‘सैराट’मधील लंगड्या आता घालणार ‘गस्त’, तानाजी गालगुंडे दिसणार नव्या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना


सैराट या २०१६ साली आलेला सिनेमा भारतीय चित्रपट जगतात मैलाचा दगड ठरला. या सिनेमाने कलाकारांपासून ते दिग्दर्शकांपर्यंत सर्वानाच एक नवीन आणि मोठी ओळख मिळवून दिली. या सिनेमातील आर्ची आणि परशा तर गाजलेच, सोबत परशाच्या म्हणजेच आकाश ठोसरच्या मित्राची भूमिका करणारा लंगड्या देखील तेवढाच प्रसिद्ध झाला. आता हाच लंगड्या म्हणजे तानाजी गालगुंडे लवकरच एका नवीन सिनेमातून आपल्याला भेटायला येणार आहे.

तानाजी लवकरच झी टॉकीजच्या ‘गस्त’ सिनेमात प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. तानाजी या भूमिकेबाबत खूप उत्सुक आहे. आपल्या या नव्या भूमिकेबाबत बोलताना तानाजी म्हणाला, “मी ‘गस्त’ या सिनेमात अमर नावाच्या मुलाची एक खास भूमिका निभावत आहे. हा अमर एका मुलीच्या प्रेमात असतो. तो राहत असलेल्या गावात पाहारा देताना तो त्या मुलीची भेट घेत असतो. पुढे या दोघांची प्रेमकथा काय वळण घेते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात मी पुन्हा गावाकडच्या मुलाची भूमिका साकारत आहे. मी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

सैराट आणि फ्री हिट दणका या दोन सिनेमांनंतर तानाजीचा हा तिसरा सिनेमा ठरणार आहे. त्याचा फ्री हिट दणकाही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर कृष्णा आणि अर्चना करतायत ‘चोरीचा प्लॅन’, व्हिडिओ झाला ‘लीक’
-‘द रॉक’ होणार अमेरिकेचा राष्ट्रपती? अभिनेत्याने उत्सुकता केली जाहीर
-काय सांगता! रवीना टंडनचा नवरा होता फराह खानचा स्लीपिंग पार्टनर, ‘या’ कारणामुळे दोघे झोपायचे एकाच बेडवर

 

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.