Thursday, July 18, 2024

‘हिंदी मीडियम’ फेम अभिनेत्रीने शेअर केला अंडरआर्मच्या केसांचा फोटो! म्हणाली, ‘मला हे आवडते आणि…’

काळाच्या ओघात जगात अनेक बदल होत आहेत. आधुनिक जगात लोकांच्या विचारसरणीपासून फॅशन सेन्सपर्यंत बरेच काही आले आहे. तिल्लोतमा शोम (Tillotama Shome) ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिल्लोतमाने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. दरम्यान, तिने तिच्या सोशल मीडियावर असा एक फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे.

तिल्लोतमाने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोत तिच्या अंडरआर्मचे केस स्पष्टपणे दिसू शकतात. या फोटोत तिल्लोतमा तिच्या अंडरआर्मचे केस बिनधास्तपणे दाखवत आहे. तिल्लोतमा शोमने तिचा हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, ती अनेकवेळा सॉरी म्हणते, पण शरीरावरील केस दाखवण्यात तिला अजिबात संकोच वाटत नाही आणि त्याबद्दल ती सॉरी म्हणत नाही.

तिल्लोतमा म्हणाली की, “मला हे आवडते. हे विधान नाही. मी वॅक्स करते आणि कधी कधी करतही नाही.” तिल्लोतमा शोमच्या या पोस्टवर चाहते उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. या पोस्टला अल्पावधीतच हजारो लाईक्स मिळाले आहेत.

तिल्लोतमा शोमच्या पोस्टवर कमेंट करताना, एका युजरने लिहिले की, “मला माफ करा पण ते खूप वाईट दिसत आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “मला केसांची काळजी नाही. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करतो.” अशाप्रकारे युजर्स हार्ट इमोजी बनवूनही अभिनेत्रीच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिल्लोतमाने २००१ मध्ये मीरा नायरच्या ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटातून तिच्या अभिनयाची सुरुवात केली होती, जी चित्रपटातील एका वेडिंग प्लॅनरशी लग्न करते. त्यासह ती दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्या ‘हिंदी मीडियम’ चित्रपटात दिसली आहे. याव्यतिरिक्त तिल्लोतमाने ‘ए डेथ इन द गुंज’, ‘चिंटू का बर्थडे’, ‘किस्सा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा