Friday, April 19, 2024

केवळ १९ वर्षाची असताना त्रिधा चौधरीने केला चित्रपटसृष्टीत प्रवेश, ‘आश्रम’मधील इंटीमेट सीनमुळे होती चर्चेत

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याच्या लोकप्रिय वेबसीरिज ‘आश्रम’ मधील बबिता नावाचे पात्र चांगलेच गाजले होते. हे पात्र इतर कोणी नाही तर २८ वर्षाची अभिनेत्री त्रिधा हिने निभावले होते. प्रकाश झा यांच्या या वेबसीरिजमध्ये अभिनेत्रीने बॉबी देओलसोबत एक इंटीमेट सीन दिला होता. या सीननंतर ती खूप जास्त चर्चेत आली होती. अशातच त्रिधाने सोमवारी (२२ नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा केला. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.

त्रिधा चौधरीचा जन्म २२ नोव्हेंबर, १९९३ मध्ये कोलकत्ता येथे झाला. ‘आश्रम’मध्ये काम करण्यासोबतच तिने भोजपूरीपर्यंत तिच्या अभिनयाचा प्रवास पूर्ण केला आहे. केवळ वेबसीरिजमध्ये नाही, तर खऱ्या आयुष्यात देखील ती खूपच बोल्ड आहे. तिच्या या बोल्डनेसमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या लूकचे लाखो दीवाने आहेत. (Actress Tridha Choudhury celebrate her birthday, let’s know about her)

त्रिधाचे सोशल मीडियावर दोन मिलियनपेक्षाही अधिक फॉलोव्हर्स आहेत. तिने बंगाली चित्रपटसृष्टीतील तिच्या करिअरला सुरुवात केली. तसेच ती साऊथमधील ‘सूर्या व्हर्सेस सूर्या’ या चित्रपटात देखील दिसली आहे.

तसेच तिच्या सौंदर्याची जादू भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आहे. तिने पवन सिंगच्या एका होळीच्या गाण्यावर डान्स केला होता.

त्रिधाने अगदी कमी वयात तिचे नाव कमावले आहे. सोशल मीडियावर तर ती खूप लोकप्रिय आहे. तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला जोरदार प्रतिसाद देत असतात. तिने २०१३साली तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यावेळी ती केवळ १९ वर्षाची होती. त्यानंतर २०२० मध्ये तिने ‘आश्रम’ वेबसीरिजमध्ये काम केले.

तसेच तिने ‘चार्जशिट’ या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. लवकरच ती ‘शमशेर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त हे असणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…

हे देखील वाचा