×

अर्रर्र! ट्रेंड फॉलो करणं उर्फी जावेदला पडलं भलतच महागात, धपकन् आपटली अभिनेत्री

आपल्या अंतरंगी कपड्यांमुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तिच्या कपड्यांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. सोशल मीडियावर ती नेहमी आपले बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. अनेक वेळा ती अशी कपडे घालून कॅमेऱ्यासमोर येते की तिच्या या चर्चेत राहण्याच्या सवयीमुळे ती स्वतःच अडचणीत येते. असाच काहीसा प्रसंग उर्फीसोबत घडला आहे. काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊ.

सोशल मीडियावर सध्या रोज नवीन काहीतरी ट्रेंड तयार होत असतो. कधी डान्स, तर कधी गाणी रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यावर लोक हजारो रिल्स बनवायला सुरुवात करतात. यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार सुद्धा मागे राहत नाहीत. असाच एक ट्रेंड फॉलो करणे उर्फी जावेदला चांगलेच महागात पडले आहे.

आपल्या अंतरंगी स्टाइलमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिच्या कपड्यांची तर स्टाइल बघून नेहमीच नेटकरी हैराण होत असतात. अलीकडेच तिने जाळीदार ड्रेस घालून आपल्या मैत्रिणीसोबत फोटो पोझ दिल्या आहेत. मात्र या ड्रेसमुळे तिला नीट बसता न आल्याने ती जोरात पडली आणि तिचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये उर्फी जावेद आपल्या मैत्रिणीसोबत पायर्‍या उतरताना दिसत आहे. त्याचवेळी दोघी खाली बसत बसत फोटो पोझ देत आहेत. मात्र यावेळी ड्रेसमध्ये नीट बसता न आल्याने उर्फी भिंतीवर जोरात आदळते आणि स्वतःच हसायला लागते. शेवटी तिची मैत्रिण तिला हात देऊन उठवते.

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

या व्हिडिओ शेअर करत उर्फीने “ट्रेंड चुकीचा झाला” असे कॅप्शन दिला आहे. यावर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण तिला काय ड्रेस आहे, म्हणत कौतुक करत आहेत. तर काहीजणांनी ओव्हर अ‍ॅक्टींग करू नकोस असे म्हणत उर्फीला जोरदार ट्रोल केल आहे. काहीही असू द्या पण अशा ड्रेसमुळे बोल्ड फोटोंमुळे ती उर्फी नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

हेही पाहा – 

हेही पाहा-

Latest Post