Thursday, April 25, 2024

अबब! चाहतने उर्फीला म्हटले दीदी; उर्फी म्हणाली, ‘काकू मी…’

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद (urfi javed)  तिच्या फॅशन आणि स्टाइल सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच तिच्या आवडत्या पोशाखांनी नेटिझन्सला आकर्षित करते. ती अनेकदा तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. अलीकडेच उर्फी जावेद आणि टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना यांच्यात सुरू असलेल्या भांडणामुळे उर्फी जावेदने चर्चेत आली आहे. उर्फी जावेदला दीदी म्हटल्याबाबत ती चाहत खन्ना हिच्यावर भडकली आहे.

तर झाले असे की, टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना (Chahat Khanna) हिचे नाव 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरशी जोडल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर उर्फीने चाहत खन्ना हिची खिल्ली उडवली. ज्यावर चाहतने प्रत्युत्तर देत तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, ‘काय झाले दीदी, तू सॉरी म्हणालीस, आता पुन्हा सॉरी म्हणायचे आहे का? आता सॉरी बोलून मला रडवणार का?

चाहतच्या या वक्तव्यावर उर्फी जावेदने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये लिहिले की, ‘काकू मी तुमच्या अर्ध्या वयाची आहे, दीदी बोलल्याने तुम्ही कूल होणार नाही. तुमच्या प्रसिद्धीसाठी माझ्या नावाचा उपयोग करणे थांबवा. जाऊन त्या गुक्की बॅग आणि घड्याळांचा आनंद घ्या. अशाप्रकारे उर्फी जावेदने चाहत खन्ना यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

यापूर्वी चाहतने उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सवर प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर उर्फीने चाहतच्या एक्स पतीच नाव काढून या प्रकरणाला आणखी हवा दिली होती. तेव्हापासून उर्फी आणि चाहत एकमेकांविरोधात अशीच वक्तव्ये करत आहेत.

उर्फी जावेदने आपल्या द्वेष करणाऱ्यांना जाहीरपणे उत्तर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. जेव्हा जेव्हा कोणी उर्फीला ट्रोल करते किंवा त्रास देते तेव्हा ती तिच्या द्वेष करणाऱ्यांना नक्कीच धडा शिकवते. उर्फी जावेद तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा:
बाबो! दीपिका आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री, तिच्याइतकी संपत्ती कुठल्याच ऍक्ट्रेसकडे नाही
सनीचा हॉट अवतार
सुकेश चंद्रशेखर प्रकरणावर अभिनेत्री चाहत खन्नाने तोडले मौन; म्हणाली,’मला सगळ्यांवर…’

हे देखील वाचा