लाडकी लेक जिजाबरोबर अभिनेत्री उर्मिला कोठारेचे भन्नाट नृत्य, लेकीनेही धरलाय ठेका


मराठीत चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर उर्मिला कोठारे. लहानपणापासून उर्मिलाला डान्सची प्रचंड आवड आहे. मोठी झाल्यावरही तिने डान्ससोबत अभिनयाचे करीअर निवडले. ती तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अवघ्या काही कालावधीतच तिच्या या डान्स व्हिडिओला प्रसिद्धी देखील मिळते. आता तिच्या सोबत तिची लेक देखील हे डान्सची धडे गिरवताना दिसत आहे. नुकताच उर्मिलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या सोबत तिची मुलगी जिजा देखील डान्स करताना दिसत आहे.

उर्मिला कोठारेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट वरून एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिच्या सोबत तिची मुलगी जिजा तिच्या डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्मिलाने आकाशी आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच जिजाने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की,” एक शिक्षक असणं भाग्याची गोष्ट असते, त्याहूनही भाग्याची गोष्ट म्हणजे एक आई असणं. पण या दोघी भूमिका सोबत पार पाडताना मला खूप आनंद होत आहे.”

उर्मिला आणि जिजाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करून माय लेकीच्या डान्सचे कौतुक करत आहेत. उर्मिलाच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरने कमेंट केली आहे , आई गं किती गोड!! तर डान्सर फुलवाने कमेंट केली आहे की,अगं माझी छोटी राजकन्या.

अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपटात तसेच हिंदी मालिकामध्ये देखील काम केले आहे. तिने मराठीमध्ये ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरू’, ‘काकन’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मायका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिलाचे लग्न मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा अभिनेता आदिनाथ कोठारे याच्या सोबत झाले आहे. आदिनाथ देखील एक कमालीचा अभिनेता आहे. उर्मिला आणि आदिनाथने ‘दुभंग’, ‘अनवट’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.