Tuesday, June 25, 2024

‘जर कोणी मला छोटी, जाडी, बोल्ड किंवा निर्लज्ज म्हटले, तरीही…’, आपल्या भूमिका जिवंत करणाऱ्या विद्या बालनचे वक्तव्य

प्रत्येक कलाकार हा आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर चर्चेत असतो. असेच काहीसे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनबाबतही आहे. विद्या आपल्या ‘शेरनी’ या चित्रपटामुळे माध्यमांमध्ये झळकत आहे. तिचा हा चित्रपट येत्या १८ जूनला ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. विद्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीत एका पेक्षा एक अशा भन्नाट भूमिका साकारल्या आहेत. आपल्या भूमिका जिंवत करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली आहे. यावेळी तिने आपल्याला आलेल्या चांगल्या- वाईट अनुभवांबद्दल माध्यमांशी चर्चा केली.

विद्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी स्टिरीओटाईप तोडण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, आपल्या आयुष्यातील अनुभवातून विशेषत: एक अभिनेत्री म्हणून मला जाणवले की, आपल्या वाटेत कोणताही अडथळा येऊ देणार नाही.”

“जर मला कोणी म्हणते की, मी अभिनेत्री म्हणून खूप छोटी आहे, जाडी आहे, खूपच बोल्ड आहे किंवा निर्लज्ज आहे किंवा खूप समजदार किंवा इतर काही आहे. मी कशीही असले, तरीही स्वत: ला बदलू शकत नाही. मात्र, मी माझी वाट निवडू शकते,” असेही तिने पुढे बोलताना म्हटले.

विद्या म्हणते की, “कामाप्रती माझ्यात जी उत्कटता आहे, त्यावर मी लक्ष देते. कारण मी स्वत: मध्ये कोणताही बदल आणू शकत नाही. मी कोणतीही गोष्ट मोडण्याचा प्रयत्न करत नाही. मी आपल्या हिशोबाने भूमिका निवडते. एक अभिनेत्री म्हणून मी माझ्या पद्धतीने पुढे जात आहे.”

विद्याने १६ वर्षांच्या वयात टीव्ही मालिका ‘हम पांच’मधून अभिनयाला सुरुवात केली होती. तिने सन २००५ साली आलेल्या ‘परिणीता’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याव्यतिरिक्त तिने ‘भूल भुलैया’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘पा’, ‘कहानी’, ‘मिशन मंगल’, ‘तुम्हारी सुलू’, ‘शंकुतला देवी’ यांसारख्या वेगवेगळ्या शैलीच्या भूमिका साकारून  प्रेक्षकांना चकित केले आहे. आता ती ‘शेरनी’ चित्रपटात एका वनअधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मानलं भावा तुला! लाडक्या अभिनेत्याला भेटण्यासाठी चाहत्याचा हैदराबाद ते मुंबई अनवाणी पायांनी प्रवास; सोनूनेही मानले आभार

-मोठी बातमी! भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादववर गुन्हा दाखल; महिलांबद्दल अश्लील गाणे बनवल्याचा आरोप

-‘ये परदा हटा दो’ गाण्यावरील मानसी नाईकच्या एक्सप्रेशन्सवर तिचा पतीही झाला फिदा; कमेंट करत म्हणतोय, ‘ये चांद…’

हे देखील वाचा