गजबच! अदा शर्माने शेअर केला जबरदस्त व्हिडिओ, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं बाई तुझ्या शरीरात हाडं आहेत की नाही?’

Adah Sharma's latest video viral on social media


बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोविंग देखील मोठ्या संख्येने आहे. इंस्टाग्राामवर तिचे जवळपास 5.3 मिलियन एवढे फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर होता क्षणीच मोठ्या संख्येने व्हायरल होत असतो. तिचे व्हिडिओ मोठ्या संख्येने पाहिले जातात. नुकताच अदाने तिचा एका जबरदस्त मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिच्या शरीरात हाडंच नाहीत असंच वाटेल.

अदाने तिचा एक मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ 5 लाखांपेक्षाही जास्त वेळा बघितला गेला आहे. या व्हिडिओमधील तिचा हा मजेशीर अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सगळेजण तिच्या या व्हिडिओवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “प्रत्येक वेळी अदाच्या यशामागे तिच्या आईचा हात असतो.”

परंतु तिच्या या व्हिडिओमध्ये दिसत असलेले पाय हे तिचे नसून तिच्या आईचे आहेत.

अदा शर्माची गणना फिट अभिनेत्रीमध्ये होती. ती कधी योगा, तर कधी वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. ती जेव्हा वर्कआउट करतानाचे व्हिडिओ शेअर करते, तेव्हा ते व्हिडिओ खूप कमी वेळात सर्वत्र व्हायरल होत असतात. तिच्या वेगळ्या स्टाईलमुळे ती खूपच चर्चित आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2008 साली तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यावेळी ती केवळ 16 वर्षाची होती. तिने विक्रम भट्ट यांच्या ‘1920’ या चित्रपटात काम केले आहे. तिचे हिंदी चित्रपट जास्त चालत नसल्याने तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अदा याआधी शेवटचे विद्युत जामवाल याच्या ‘कमांडो 3’ या चित्रपटात दिसली होती. या दोघांच्या अफेयरच्या देखील बातम्या येत होत्या. परंतु त्या दोघांनी यावर काहीच भाष्य केले नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम हिंदुस्तानी भाऊला मुंबई पोलिसांकडून अटक, काय आहे प्रकरण? घ्या जाणून

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल


Leave A Reply

Your email address will not be published.