‘आशिकी २’ चित्रपटातून सर्वत्र प्रसिद्ध झालेला अभिनेता आदित्य कपूर (Aaditya Kapur) अनेक दिवस नवीन चित्रपटात झळकला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अनेक दिवसांपासून त्याच्या नवीन चित्रपटाची उत्सुकता लागली होती. आता त्याच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून लवकरच तो त्याच्या आगामी ‘ओम’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटाबद्दल जास्त माहिती समोर आली नसली तरी पोस्टर पाहून त्यामध्ये आदित्य कपूरची धमाकेदार भूमिका पाहायला मिळणार आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘आशिकी २’, ‘ओके जानू’ सारख्या चित्रपटांतून अभिनेता आदित्य कपूरने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. या चित्रपटातील आदित्य कपूरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटांमुळे आदित्य कपूरने आपली रोमँटिक हिरो अशीच प्रतिमा आतापर्यंत ठेवली होती. मात्र आदित्यच्या आगामी ‘ओम’ चित्रपटात त्याची वेगळीच भूमिका पाहायला मिळणार आहे.
टीझरच्या सुरुवातीला आदित्य रॉय कपूर ‘मला काहीच आठवत नाही’ असे म्हणताना ऐकू येत आहे. यानंतर ‘भाग ऋषी भाग’ असा आवाज येतो. तर मागून एक लहान मूल ‘पापा’ असे ओरडताना ऐकू येते. यानंतर पडद्यावर जोरदार कृती सुरू होते आणि आदित्य रॉय कपूर म्हणतो की ‘लढाई जिंकण्यासाठी अनेक वेळा लढावे लागते.’ या थरारक टीजरमुळे चित्रपटाची कथा खूपच रहस्यमय असल्याचे वाटत आहे.
दरम्यान हा बहुचर्चित चित्रपट 1 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कपिल वर्मा यांनी केले असून अहमद खान आणि शारा खान आणि झी स्टुडिओज यांनी मिळून त्याची निर्मिती केली आहे. आदित्य रॉय कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, याशिवाय तो ‘व्हिलन २’ मध्येही दिसणार आहे. यापूर्वी तो ‘लुडो’ या चित्रपटात दिसला होता. आता या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने नाकारल्या ‘या’ बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स
- गाण्याचे अश्लिल बोल पाहूनही मान्यता दिल्याबद्दल अवधूत गुप्तेने सेन्सर बोर्डाचे मानलेत आभार, पोस्ट होतेय व्हायरल
- भोजपुरी गायिका असणारी शिल्पी राजने एमएमएस प्रकारांवर मौन सोडत म्हटले, ‘हा माझ्याविरोधात असणारा कट’