आदित्य नारायणने पत्नी श्वेताच्या प्रेग्नंसीबाबत दिले स्पष्टीकरण; म्हणाला, ‘हे चुकीच्या पद्धतीने समोर आले…’


गायक उदित नारायण यांचा मुलगा आणि अभिनेता, होस्ट असलेला आदित्य नारायण याने काही दिवसांपूर्वी असा काही खुलासा केला होता, ज्यामुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले होते. त्याने सांगितले होते की, त्याची पत्नी श्वेता अगरवाल त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म देऊ इच्छिते. यावर त्याने आता त्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सांगितले आहे की, तो एवढ्या लवकर बाबा होणार नाहीये.

आदित्यने सांगितले की, “असे झाल्यास आम्ही एक घोषणा करू. आम्ही 2022 पासून अजून दीड वर्ष दूर आहोत. त्यामुळे मला आशा आहे की, आमच्याकडे जेवढा वेळ आहे आणि जो काही रोमान्स होत आहे, तो तर होणारच आहे. पण मला असे वाटते की, हे चुकीच्या पद्धतीने समोर आले आहे, पण असे काहीच नाहीये. मी फक्त एवढंच म्हणत होतो की, मी त्या क्षणाची वाट पाहत आहे. मी लग्न केले, मी एक घर घेतले. आता मी हे सगळं पुढे घेऊन जाण्यास खूप उत्सुक आहे.”

आदित्य छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याने हे कबूल केले आहे की, त्याला टेलिव्हिजनवरून ब्रेक घ्यायचा आहे. (Aditya Narayan clarified on his statement said shweta is not pregnant and my full focus is on my career)

याबाबत त्याने सांगितले की, “टीव्हीवर होस्ट म्हणून 2022 हे माझे शेवटचे वर्ष असणार आहे. यानंतर मी होस्टिंग करणार नाही. आता काहीतरी मोठे आणि वेगळे करण्याची वेळ आली आहे. माझ्या काही कमिटमेंट आहेत ज्या आता येणाऱ्या दिवसात पूर्ण होणार आहेत. मी पुढच्या वर्षी टीव्हीवरून ब्रेक घेणार आहे. एकाच वेळी अनेक गोष्टी करायला मजा येते पण त्याने माणूस थकून देखील जातो. मी खूप आभारी आहे की, गेल्या 15 वर्षापासून मी टेलिव्हिजनचा भाग आहे. यात काम करून मला खूप आनंद झाला आहे, पण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.”

आदित्य आणि श्वेताने डिसेंबरमध्ये लग्न केले आहे. त्यांनी मुंबईमधील इस्कॉन मंदिरात हे लग्न केले होते. त्या दोघांची पहिली भेट ‘शापित’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. लग्नाच्या आधी ते दोघे 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. आदित्यने 2007 साली सिंगिंग रियॅलिटी शो ‘सारेगामापा चॅलेंज’मधून होस्टच्या रुपात सुरुवात केली होती. त्याने ‘इंडियन आयडल 11’ आणि ‘इंडियन आयडल 12’ ही‌ दोन्ही पर्व होस्ट केली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.