Tuesday, March 5, 2024

आदित्य नारायण याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल, भर कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना मारून फोन दिला फेकून

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan)यांचा मुलगा गायक आदित्य नारायण (Aditya narayan) याचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान आदित्यने त्याच्या चाहत्यांसोबत गैरवर्तन केले असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरुन नेटकरी आदित्यावर संताप व्यक्त करत आहेत.

लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहत्याच्या हातावार आदित्यने मारलं, त्याचा फोन हिसकावून घेतला. इतकेच नव्हे तर त्याने चाहत्याचा फोन फेकूनही दिला असल्याची घटना घडली. यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

आदित्य नारायण छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये कॉन्सर्टसाठी गेला होता. या कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी आदित्य शाहरुख खानच्या डॉन या चित्रपटामधील गाणं गात होता. दरम्यान आदित्यचा संयम सुटला. एक चाहता त्याच्या फोनमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्यावेळी आदित्यचे त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याने माईकने त्याच्या हातावर मारलं, नंतर फोन हिसकावून गर्दीत फेकून दिला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्याने असे का केलं? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा, आदित्य नारायणचा शो बायकॉट करा, वडिलांचे नाव खराब करत आहे. आदित्य नारायणला काय प्रॉब्लेम आहे? असे अनेक कमेंट्स युजर्स त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर करत आहेत.

यापूर्वीही अनेक वादाच्या भोवऱ्यात आदित्य अडकला आहे. काही दिवसांपूर्वी ‘इंडियन आयडॉल’ या शोदरम्यान महान गायक किशोर कुमार यांच्या मुलासोबत वाद झाला होता. त्या घटनेनंतरही आदित्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बिग बॉस फेम मनारा अन् अभिषेक रोमँटीक अंदाजात, ‘सांवरे’ सॅांग लॉन्च
‘तिला माझं प्रत्येक दुःख माहित आहे..’ अंकिताने केला कंगना आणि तिच्या घट्ट मैत्रीचा खुलासा

हे देखील वाचा