Friday, June 14, 2024

‘मेजर’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेता अदिवी सेषने घेतली ‘या’ व्यक्तींची भेट

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू त्याच्या आगामी चित्रपटाबाबत खूप चर्चेत आहे. त्याचा ‘मेजर’ हा चित्रपट देखील चर्चेत आहे, ज्यामध्ये अदिवी सेषने (Actor Adivi Sesh) मेजर संदीप उन्नीकृष्णन (Major Sandeep Unnikrishnan) यांची भूमिका निभावली होती. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून जास्त वेळ आहे, परंतु यापूर्वीच अदिवी सेषने २६/११ च्या मुंबई हल्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या वीर जवानांची आठवण काढत शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) एका छोट्याशा समारंभाचे आयोजन केले होते. त्याने ठेवलेल्या या कार्यक्रमात संदीप उन्नीकृष्णनचे वडील उन्नीकृष्णनन आणि आई धनलक्ष्मी कृष्णन हे आले होते.

शहीद संदीप यांचे आई-वडील दरवर्षी त्यांच्या मुलाच्या आठवणीत मुंबईमधील ताजमहाल हॉटेलला जातात. यावर्षी ‘मेजर’ चित्रपटामुळे अभिनेता अदिवी सेष देखील उन्नीकृष्णन यांच्या परिवाराचा हिस्सा बनला आहे.
(Adivi sesh, mahesh babu plays major Sandeep unnikrishnan role)

महेश बाबू निर्मित या चित्रपटात संदीप उन्नीकृष्णन यांची कहाणी दाखवली जाणार आहे. या चित्रपटात संदीप यांचे बालपण, किशोरावस्थेपासून मुंबई हल्यात झालेल्या अनेक घटना आणि त्यांच्या बहादुरीपर्यंतचा सगळा प्रवास दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या टिझरमधील ती घटना पाहून नक्कीच तुमचा थरकाप उडेल, जेव्हा २६ नोव्हेंबर, २००८ साली मुंबईमध्ये हल्ला झाला होता. यातील संदीप यांच्या बलिदानाची कहाणी लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी, २०२२मध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अदिवी सेषसोबत शोभिता धुपिवाला, सई मांजरेकर, प्रकाश राज, रेवती आणि मुरली शर्मा यांसारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अंतिम’च्या स्क्रिनिंगमध्ये रंगली दिशा पटानीच्याच लूकची चर्चा, युजर्स म्हणाले, ‘सर्जरी केली का?’

-अरे संसार संसार! मानसी नाईक सासरी करतीये चुलीवर चपात्या, व्हिडिओ झाला व्हायरल

-रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित ‘८३’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा