अक्षय कुमार हा एक बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. तर त्याचा आगामी चित्रपट म्हणजे भूत बंगला. अक्षय कुमारने आतापर्यंत आणि उत्तम चित्रपट केले आहे. तसेच भूत बंगला चे दिग्दर्शक प्रियदर्शन आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने या आधीही उत्तम चित्रकार दिले आहेत. तर बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम केली आहे. आडव्हान्स बुकिंग आता सुरू झाले असून हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मात्र 16 एप्रिल 2026 पासून पेड प्रिव्ह्यूसह प्रदर्शित होणार आहे.
भूत (Bhoot)बंगला अखेर 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. तर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी पेड प्रिव्ह्यूचीही व्यवस्था केली आहे. पेड प्रिव्ह्यू शो 16 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता सुरू होतील. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत वामिका गब्बी, तब्बू, परेश रावल, असरानी आणि तब्बू यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अक्षय कुमारने स्वतः जाहीर केल्यानुसार, या हॉरर-कॉमेडीसाठी ॲडव्हान्स बुकिंग अधिकृतपणे सुरू झाले आहे. परिणामी, लोक आता चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगच्या आकड्यांकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
ॲडव्हान्स बुकिंग ची पध्दत या आधी ‘धुरंधर 2’ चित्रपटाने देखील वापरली होती आणि आता ‘भूत बंगला’च्या निर्मात्यांनीही पध्दत अवलंबली आहे. तर आता या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगची कामगिरी कशी राहिल या कडे आता सर्वाच्या नजरा लागुन राहल्या आहेत. हा चित्रपट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आला आहे. जे करुन इतर चित्रपटामुळे कमाई मध्ये कोणतीहि आडचन येऊ नये. तर आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










