Thursday, April 10, 2025
Home अन्य रुबीना दिलैक प्रेग्नेंट आहे का? नेटकऱ्यांच्या प्रश्नांवर अभिनव शुक्लाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ती खरोखर…’

रुबीना दिलैक प्रेग्नेंट आहे का? नेटकऱ्यांच्या प्रश्नांवर अभिनव शुक्लाची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ती खरोखर…’

अभिनेत्री रुबीना दिलैक हे एक हिंदी टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध नाव आहे. रुबीना दिलैकने विविध मालिकांमधून काम करत तिने मोठा प्रेक्षकवर्ग कमावला आहे. शिवाय बिग बॉसचा १४वा सीझन जिंकत रुबीनाने लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. दरम्यान सध्या रुबीना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, या चर्चेचं कारण ठरला तिने अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केलला व्हिडिओ.

झालं असं की, रुबीनाने (Rubina Dilaik) तिच्या इंस्टाग्रामवर सुंदर फुलांचा ड्रेस घालून केलेली एक रील शेअर केला आहे. यानंतर तिच्या गरोदरपणाच्या अफवा पसरू लागल्या. या आधीही रुबीना आणि अभिनव शुक्ला एका क्लिनिकमध्ये स्पॉट झाले होते. त्यानंतर लोकांनी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली होती. त्यावरून सोोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहेत. नुकतीच रूबिनाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

फोटो शेअर करत असताना रुबिनाने कॅप्शनद्वारे नेटकऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचवेळी रुबीनाचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला यांनी अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “या फक्त अफवा आहेत. मी त्यावेळी प्रवास करत होतो, त्यामुळे मी याबद्दल फारसे वाचले नाही. मला खरोखर माहित नाही की काय झाले आणि काय चालले आहे. मला फक्त हे सांगायचं आहे की, रुबिनाने फक्त एक एक फोटो व व्हिडिओ पोस्ट केला आहे. लोक त्यावर कमेंट करू लागले की रुबिना प्रेग्नेंट आहे का? मला त्याबद्दल काहीही म्हणायचे नाही. लोकांना काय अनुमान लावायचे लावू द्या,” असं सडेतोड उत्तर अभिनवने ट्रोलर्सना दिले आहे.

दुसरीकडे, रुबीनाने सोशल मीडिया ट्रोल्सचा सामना कसा करते याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. ती म्हणते की, सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे आहेत. कधीकधी ट्रोलर्सचा तिच्यावर परिणाम होतो. पण मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे शिकले पाहिजे. (Afghan Abhinav Shukla of Ruby Dilak’s Princely Army reacts)

अधिक वाचा- 
पती-पत्नीचं नातं संपलं! सात जन्माच्या शपथा खाऊनही मोडला श्रुती रावतही अन् निखिल आगवणेचा संसार?
पाकिस्तानी सीमा हैदर हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार? ‘या’ निर्मात्याने दिली ऑफर

हे देखील वाचा