Thursday, June 13, 2024

पती-पत्नीचं नातं संपलं! सात जन्माच्या शपथा खाऊनही मोडला श्रुती रावतही अन् निखिल आगवणेचा संसार?

मनोरंजन विश्वात अफेअर व लग्न करणं आणि नंतर ते तुटणं ही एक आता सामान्य गोष्ट झाली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. गेल्या दिवसांपासून बॉलिवुड अभिनेता फरदिन खान आणि राहुल महाजन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या , तर आता ‘क्या हाल मिस्टर पांचाल’ फेम अभिनेत्री श्रुती रावतहीने देखील नुकतेच पती निखिल आगवणे पासून वेगळे झाल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.

३१ जुलै २०२३ रोजी श्रुती रावतने (Shruti Rawat) तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर याबाबत माहिती दिली. श्रुतीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खूप विचार केल्यानंतर, निखिल आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आपापल्या आयुष्यातील वाटेवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आमच्यात जवळपास एक दशक मैत्री होती. मैत्री हा आमच्या नात्याचा गाभा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमची मैत्री कायम असेल. आम्ही आमच्या शुभचिंतकांना विनंती करतो की, त्यांनी या काळात आम्हाला सपोर्ट करावा आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्यावी.”

श्रुती असंही म्हणते की, आमच्यातील पती-पत्नी म्हणून प्रवास संपतो आहे. तरीही भविष्यात आम्ही दोघेही मित्र राहू. आमच्यातील मैत्रीचं नातं कधीचं संपणार नाही. ‘क्या हाल मिस्टर पांचाल’, ‘चिंटू चिंकी और एक बडी सी लव्ह स्टोरी’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या सारख्या मालिकेत काम करून श्रुती रावतला प्रसिद्धी मिळाली.

श्रुती व निखिल रिलेशनशिपमध्ये होते, श्रुती रावतने डिसेंबर २०१६ मध्ये तिचा बॉयफ्रेंड निखिल आगवणेसोबत लग्न केले. जानेवारी २०१९ मध्ये, श्रुती आई झाली. पण त्याचवेळी श्रुतीचे वैवाहिक जीवन सुखी नाही आहे, अश्या चर्चा सुरू होत्या. आता लग्नाच्या सात वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. श्रुतीच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. (Actress Shruti Rawat and Nikhil Agwane will also take the gossip)

अधिक वाचा- 
पाकिस्तानी सीमा हैदर हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार? ‘या’ निर्मात्याने दिली ऑफर
दीपिकाचा बिकिनीतील लूक पाहून नवराही झाला खल्लास; म्हणाला, ‘हा चांगला इशारा…’

हे देखील वाचा