Saturday, July 27, 2024

इमरान हाश्मीच्या ‘लुट गए’ गाण्याची क्रेझ आफ्रिकेतही, ‘या’ जोडप्याने गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल

आजच्या काळात सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म बनला आहे, जिथे दररोज काहीतरी व्हायरल होत असते. मग ते फोटो असोत किंवा एखादा व्हिडिओ. अशा व्हायरल व्हिडिओला नेटकरी भरभरून प्रतिसाद देत असतात. विशेषत: डान्स आणि म्युझिकशी संबंधित कोणताही व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्याला अनेक लोकच काय, तर सेलिब्रिटीही पसंत करत आहेत. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये वाजणारे गाणे हे बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणे आहे, तर त्यावर परफॉर्म करणारे कलाकार आफ्रिकन आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते गाण्यावर खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे भावही इतके छान आहेत की, त्यांना हिंदी येत नाही असे वाटत नाही. (african girl and boy great performance on raatan lambiyan song video goes viral on social media)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुढे एक मुलगा आहे आणि त्याच्या मागे एक मुलगी उभी आहे. यामध्ये ते इमरान हाश्मीच्या ‘लुट गए’ या गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. याला कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, “यापेक्षा चांगले लिप सिंक करू शकलो नसतो.” या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

यापूर्वी त्यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ या बॉलिवूडमधील चित्रपटातील ‘राता लंबिया’ या गाण्यावर दोघेही परफॉर्म केले होते. हे गाणे जुबिन नौटियाल आणि असीस कौर यांनी गायले आहे. हे गाणे सध्या भारतात सर्वांच्याच जिभेवर आहे आणि आता आफ्रिकेतील लोकांनाही ते आवडू लागले आहे.

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला असून, “संगीत सीमांच्या पलीकडे आहे,” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडिओ अवघ्या ४५ सेकंदांचा आहे, ज्याला आतापर्यंत ८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर १८०० हून अधिक युजर्सने या व्हिडिओला लाईक केले आहे. या व्हिडिओवर युजर्सने वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

‘शेरशाह’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटात कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते. यातील दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली होती. हा चित्रपट विक्रम बत्रा यांच्या कथेवर आधारित आहे, ज्यांना कारगिल युद्धात वीरमरण आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा