सध्या कलाविश्र्वात अनेक कलाकारांचे संसार उद्धवस्त होताना दिसत आहेत. अनेक घटस्पोट हे पती पत्नींच्या मतभेदांमुळे होत आहेत. आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतून आणखी एक घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे चाहते नाराज होताना दिसत आहेत. दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक बालसुब्रमण्यम उर्फ बाला त्याची पत्नी मुथुमलार (जिला मलार म्हणून ओळखले जाते) पासून वेगळे झाले आहेत. त्या दोघांचा ५ मार्च रोजी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट झाला. बाला आणि मलार यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, जो ५ मार्च रोजी मंजूर झाला होता. बाला आणि मलारच्या घटस्फोटाच्या बातमीने इंडस्ट्रीला धक्का बसला, त्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला.
चार वर्षांपासून राहत होते वेगळे
बाला (Bala) आणि मलार (Muthumalar) यांच्यात खूप वर्षांपूर्वी अंतर येऊ लागले होते. चार वर्षांपासून ते वेगळे राहत होते. त्यांना प्राथर्ना नावाची मुलगी देखील आहे.
दोघांमध्ये काही वर्षांपूर्वी झाले होते मतभेद
बाला आणि मलार यांच्यातील मतभेद काही वर्षांपूर्वी सुरू झाले होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून दोघेही एकत्र राहत नव्हते. विभक्त झाल्यानंतर बाला त्याच्या कामात व्यस्त असताना, मलार अनेकदा जयम रवीची पत्नी आरती, गायिका संधवी आणि त्याच्या काही मित्रांसोबत फिरताना दिसली. त्यांच्यातील मतभेद पाहता दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि आता त्यांचा घटस्फोट मंजूर झाला.
२००४ मध्ये झाले होते लग्न
दिग्दर्शक बाला आणि मुथुमलर यांनी ५ जुलै २००४ रोजी मदुराई येथे पारंपारिक समारंभात लग्न केले. १७ वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला.
अभिनेता सुर्यासोबत चित्रपटाची करत आहे तयारी
ध्रुव कुमार वर्माचा ‘वर्मा’ हा दिग्दर्शक बालाचा शेवटचा प्रोजेक्ट होता. त्याचवेळी, काही काळापूर्वी बाला अभिनेता लवकरच सुरियासोबत चित्रपट करणार असल्याची बातमी आली होती. बाला या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.
हेही वाचा –