Friday, March 29, 2024

जेव्हा भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे बनली बंगाली बाला, तेव्हा तिला पाहून फॅन्स म्हणाले…

भोजपुरी इंडस्ट्रीला सध्या सुगीचे दिवस आले आहे. या क्षेत्रातही गाणे, कलाकार, सिनेमे यांना संपूर्ण देशात पर्यायाने जगात ओळख मिळताना दिसत असून, भोजपुरी भाषा देखील मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होत आहे. याच इंडस्ट्रीमधील भोजपुरी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आम्रपाली दुबेला (Amrapali Dubey) कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर या गलमेर इंडस्ट्रीमध्ये तिच्या अभिनयाने आणि दिलखेचक नृत्यामुळे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आम्रपालीला अमाप फॅन फॉलोविंग आहे. या फॅन्ससोबत जोडलेले राहण्यासाठी आम्रपाली एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावरही तिचा मोठा वावर आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे आम्रपाली नेहमीच मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये गाजताना दिसते.

नुकताच आम्रपालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आम्रपाली ‘पानी-पानी’ या गाण्याच्या भोजपुरी व्हर्जनवर डान्स करताना दिसत आहे. मूळच्या खेसारी लाल आणि अक्षरा सिंह यांच्या या गाण्यावर आम्रपालीने तिच्या आकर्षक डान्स मुव्हज करताना दिसत असून, तिचा हा डान्स सर्वांनाच आवडत आहे. या व्हिडिओमध्ये आम्रपालीने मालती रंगाचे ब्लाऊज घातले असून, त्यावर लाल आणि पांढऱ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. हातात खूपच साऱ्या बांगड्या, कानात झुमके, नेकलेस आणि कपाळावर आकर्षक टिकली लावलेली दिसत आहे. तिच्या या डान्ससोबतच तिच्या लूकने देखील फॅन्सचे लक्ष वेधले आहे.

हा व्हिडिओ आम्रपाली दुबेने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना कॅप्शनमध्ये ‘गेंदा फुल’ लिहिले. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आले असून, फॅन्सच्या यावर भरभरून कमेंट्स येत आहे. एका फॅन लिहिले, “विष आहेस तू’, एकाने लिहिले, “तू रॉक केले आहेस.” आम्रपाली दुबेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिचे दोन सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज असून, लवकरच ते प्रदर्शित होणार आहे. ‘आशिकी’ या सिनेमामध्ये आम्रपाली खेसारी लाल यादवसोबत रोमान्स करताना दिसत आहे. तर दुसरा ‘आई मिलन की रात’ सिनेमात आम्रपाली दुबे आणि दिनेश लाल यादव ही जोडी धमाल करताना दिसणार आहे.

हेही वाचा  –

हे देखील वाचा