Friday, June 26, 2026
Home बॉलीवूड ३४ कलाकार, ५० व्हॅनिटी व्हॅन्स ‘वेलकम टू द जंगल’चा भव्य सेट कसा सांभाळला, याचा दिग्दर्शक अहमद यांनी केला खुलासा

३४ कलाकार, ५० व्हॅनिटी व्हॅन्स ‘वेलकम टू द जंगल’चा भव्य सेट कसा सांभाळला, याचा दिग्दर्शक अहमद यांनी केला खुलासा

‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट नुकतच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटांमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत तसेच या चित्रपटाची रिलीज पुर्वीच प्रचंड चर्चा सुरू होती. हा एक कॉमेडी चित्रपट असून सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास रेडी आहे. या चित्रपटामध्ये तुम्ही विचार करू शकणार नाहीत एवढे उत्तम कलाकार आहेत. या चित्रपटाची टीम मोठी आहे यांची संख्या एकूण 34 आहे. हा चित्रपट आज म्हणजेच 26 जुनला रीलीज झाला आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांना केले आहे. तर या चित्रपटावेळेची एक गोष्ट दिग्दर्शक अहमद खान (Khan)यांनी  शेअर केली आहे. ते एका मुलाखतीत म्हणाले  की, इतक्या सुपरस्टार्सना एका फ्रेममध्ये एकत्र आणणे आणि त्यांचे वेळापत्रक सांभाळणे हे त्याच्यासाठी एव्हरेस्ट चढण्यासारखे होते. पण कोणाताही कोणाच्यात पण इगो नव्हता. मात्र टाइमलाइन आणि तारखा व्यवस्थापित करणे, कॅमेरा फ्रेम सेट करणे आणि प्रचंड भौतिक सेट तयार करणे हे एक मोठे आव्हान होते.

या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भुमिका करत आहे. तसेच अक्षक व्यतिरिक्त सुनील शेट्टी, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन, लारा दत्ता, फरीदा जलाल, जॉनी लीव्हर, श्रेयस तळपदे,   कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर मेहंदी, आफताब शिवदासानी, मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, किरण कुमार, झाकीर हुसेन, विंदू दारा सिंग, उर्वशी रौतेला, हेमंत पांडे, ब्रिजेंद्र काला, फिरोज खान, दिवंगत पंकज धीर, सुवेर धीर, हे सारे कलाकार या चित्रपटात आहेत.

 

प्रहारचा टीझर झाला रिलीज, राजकुमार राव यांच्या दमदार लुकने आणला अंगावर काटा

 

हे देखील वाचा