Friday, June 26, 2026
Home बॉलीवूड वेलकम टू द जंगल या चित्रपटाचा प्रत्येक दृश्य आहे मजेशीर, यातील कलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने

वेलकम टू द जंगल या चित्रपटाचा प्रत्येक दृश्य आहे मजेशीर, यातील कलाकारांनी जिंकली प्रेक्षकांची मने

अक्षय कुमार हा बॉलीवूड मधील एक लोकप्रिय कलाकार आहेत कारण त्याचे आतापर्यंतचे चित्रपट हे नेहमीच ब्लॉकबस्टर राहिले आहेत आणि तू त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांना हसण्याचे काम तो नेहमी करत असतो. जसे की हेराफेरी, गरम मसाला, वेलकम, भूत बंगला या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना प्रचंड हसवले आहे आणि सध्या त्याचा रिलीज झालेला चित्रपट म्हणजे वेलकम टू द जंगल हा चित्रपट आता बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे तसेच या चित्रपटाचे टीम सुद्धा खूप मोठी आहे. तर या चित्रपटात एकूण 34 दिग्गज कलाकारांनी काम केले आहे.

वेलकम टू द जंगल हा चित्रपट रिलीज पूर्वीच सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिलेला आहे आणि आता सध्या तर 26 जून म्हणजेच आज हा चित्रपट रिलीज झाला आहे. याच्यावर आता जबरदस्त प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पैसा वसूल असा हा चित्रपट असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. या चित्रपटात भोजपुरी गाणी आणि पात्रांमधील विनोदी संवाद ते देशभक्ती, मैत्री आणि शत्रुत्व यांसारख्या विषयांपर्यंत, प्रत्येक दृश्य तुमचे मन आणि हृदय जिंकून घेते.

त्याचबरोबर, तुषार कपूर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर मेहंदी, आफताब शिवदासानी, मुकेश तिवारी, यशपाल शर्मा, किरण (kiran)कुमार, झाकीर हुसेन, विंदू दारा सिंग, पंकज धीर, फिरोज खान, पुनीत इस्सार आणि जॅकी श्रॉफ यांनीही आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी त्यांना पुरेसा ‘स्क्रीन टाइम’ मिळाला आहे. यात फरीदा जलाल आणि रवीना टंडन यांच्या भूमिका सर्वात महत्त्वाच्या आहेत. तर जॅकलीन फर्नांडिस आणि दिशा पटानी भुमिका छोटी जरी असली तरी उत्तम निभावली आहे.

३४ कलाकार, ५० व्हॅनिटी व्हॅन्स ‘वेलकम टू द जंगल’चा भव्य सेट कसा सांभाळला, याचा दिग्दर्शक अहमद यांनी केला खुलासा

हे देखील वाचा