Friday, August 28, 2026
Home बॉलीवूड केईआय इंडस्ट्रीज लिमिटेडने रश्मिका मंदानाला कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून केली नियुक्ती

केईआय इंडस्ट्रीज लिमिटेडने रश्मिका मंदानाला कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून केली नियुक्ती

रश्मिका मंदाना हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य आणि बाॅलीवुड मध्ये ही आपले कमावले आहे. तसेच तिचा नुकताच एक चित्रपट रीलीज झाला आहे. आणि तो चित्रपट म्हणजे काॅकटेल 2 तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीस उतरत आहे. तर आता रश्मिका मंदाना हिला ‘केईआय इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे. तसेच हि कंपनी एक भारतातील आघाडीच्या वायर आणि केबल उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. 

रश्मिका (rashmika)मंदाना हिला ब्रँड ॲम्बेसेडर करण्यामागचा हेतु म्हणजे कंपनीच्या मते, या भागीदारीमुळे देशभरातील ग्राहकांशी ब्रँडचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल. या सहयोगातून, ग्राहकांशी असलेला संवाद अधिक सखोल करणे आणि बाजारातील आपली उपस्थिती नव्या उंचीवर नेणे हे ‘केईआय’चे उद्दिष्ट आहे. तसेच या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांनी म्हणले कि, ज्याप्रकारे रश्मिका तिच्या उत्तम अभिनय आणि चित्रपटासाठी ओळखली जाते त्याचप्रमाणे ही कंपनी देखील उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांसाठी आणि सेवांसाठी ओळखली जाते.

तसेच या कंपनीचे संचालिका अर्चना यांना म्हणले की रश्मिका ही एक आजच्या काळातील महिलासाठी उत्तम आदर्श आहे कारण ती एक स्वावलंबी आणि प्रेरणादायी स्त्री आहे. तर या भागीदारीमुळे महिलांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास आणि यशाची नवी शिखरे गाठण्यास प्रेरणा मिळेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. तर आता ‘केईआय’ लवकरच रश्मिका मंदानाचा सोबत मार्केटिंग मोहीम सुरू करणार आहे.

 

.हृतिक रोशनने पूर्ण केले ‘जेलर २’ चे चित्रीकरण, दिग्दर्शकाने यासाठी केले अभिनेता आणि रजनीकांत यांचे कौतुक

 

हे देखील वाचा