Tuesday, February 4, 2025
Home अन्य बोल्ड एँड ब्युटीफुल! ‘मिस युनिव्हर्स’ बनताच हरनाज संधू झाली बोल्ड, लेटेस्ट फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

बोल्ड एँड ब्युटीफुल! ‘मिस युनिव्हर्स’ बनताच हरनाज संधू झाली बोल्ड, लेटेस्ट फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब पटकावणाऱ्या हरनाज संधू हिची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. लोक तिच्याबद्दलची प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे सोशल मीडिया अकाऊंट शोधत आहेत. दरम्यान, हरनाझने अलीकडेच अशाच एका फोटोशूटचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोशूटमध्ये हरनाजने ब्रा आणि टॉपशिवाय कोटने स्वतःला झाकले आहे.

परिधान केली नाही ब्रा आणि टॉप
‘मिस युनिव्हर्स’ झाल्यानंतर हरनाजने (Harnaaz Sandhu) फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये हरनाजने ‘मिस युनिव्हर्स’चा मुकुट डोक्यावर घातलेला दिसत आहे. यासोबत हरनाजने गुलाबी रंगाचा कोट परिधान केला आहे. या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे की, मिस युनिव्हर्सने ना ब्रा घातली होती ना कोटच्या आत टॉप. त्यामुळे ‘मिस युनिव्हर्स’चा हा फोटो चर्चेत आहे.

सुंदर दिसत आहे हरनाज
हरनाझच्या सौंदर्याने पूर्ण जग वेडे झाले आहे. या लेटेस्ट फोटोशूटमध्ये हरनाज प्रचंड सुंदर दिसत आहे. तिच्या या सुंदर फोटोवरून नजर हटवणे देखील कठीण झाले आहे. फोटोमध्ये हरनाज हलक्या मेकअपसह मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे.

फोटोसह लिहिले सुंदर कॅप्शन
या फोटोशूटचा फोटो शेअर करत हरनाजने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर कॅप्शनमध्ये लिहिले की, “संपूर्ण विश्व तुमच्या आत आहे.”

‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन हरनाजने जिंकले मन
‘मिस युनिव्हर्स’ २०२१ मध्ये सर्व टॉप तीन स्पर्धकांना, “दबावाचा सामना करणाऱ्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर हरनाजने उत्तर दिले, “तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की, तुम्ही अद्वितीय आहात आणि तेच तुम्हाला सुंदर बनवते. बाहेर या, स्वतःसाठी बोलायला शिका, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात.” या उत्तरासह हरनाजने यंदाच्या मिस युनिव्हर्स २०२१ चा खिताब जिंकला.

हरनाज मूळची आहे चंदीगडची
पंजाबमधील चंदीगड येथील रहिवासी असलेली हरनाज व्यवसायाने मॉडेल आहे. २१ वर्षीय हरनाजने मॉडेलिंग आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आणि जिंकूनही अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिले. हरनाजने २०१७ मध्ये ‘मिस चंदीगड’चा किताब जिंकला होता. यानंतर तिने मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडियाचा किताब पटकावला. ही दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर हरनाजने ‘मिस इंडिया २०१९’ मध्ये भाग घेतला आणि त्यानंतर ती टॉप १२ मध्ये पोहोचली.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा