Tuesday, September 26, 2023

‘जवान’नंतर शाहरुखच्या ‘डंकी’ची मीडियावर क्रेझ, किंग खान करणार 21 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स

बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान जेव्हा जेव्हा थिएटरमध्ये येतो तेव्हा त्याचे येणे चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नसते. ‘पठाण‘बद्दल बोलायचे तर ‘पठाण‘ने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा व्यवसाय केला होता. बाहुबली आणि केजीएफ सारख्या सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड शाहरूखने एकाच वेळी मोडले होते. आता ‘जवान‘ पहिल्या दिवशी 129 कोटींचा व्यवसाय करून सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट बनला आहे. एकीकडे ‘जवान’ सतत ट्रेंड करत असताना, शाहरूखच्या दुसऱ्या एका चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. शाहरुख खान आणखी एक चित्रपट घेऊन येणार आहे. ‘डंकी’ या चित्रपटात शाहरूख खान दमदार अभिनय करताना दिसणार आहे.

‘डंकी’ (Dunki) हा चित्रपट शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आगामी चित्रपट आहे, या चित्रपटात तो तापसी पन्नूसोबत (Taapsee Pannu) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तापसी शाहरुखपेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. या दोन्ही प्रतिभावान स्टार्सना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहणे खूप मनोरंजक असेल. नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, या फोटोमध्ये किंग खान तापसी पन्नूसोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अनेक यूजर्सनी दावा केला आहे की अभिनयाच्या बाबतीत ‘डिंकी’ हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट असेल. सोशल मीडियावर ‘डंकी’ (#DunkI) हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हा शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 2023 हे शाहरुख खानचे वर्ष आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ‘पठाण’ आणि ‘जवान’ ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता राजकुमार हिरानीचा ‘डंकी’ हा मोठ्या पडद्यावर धमाल करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, हिराणी यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.

लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. राजकुमारने ‘3 इडियट्स’, ‘पीके’, ‘संजू’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. आता चाहते ‘डंकी’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट तीन महिन्यांनंतर म्हणजेच 22 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होऊ शकतो. पण निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. (After Jawan Shahrukh Khan and Taapsee Pannu’s Dunky is a social media craze)

अधिक वाचा-
आलिया भट्टने पती रणबीर कपूरला मारली मिठी अन्…, रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
राणादाच्या मांडीवर बसून पाठक बाईंनी दिल्या पोज, पाहा फोटो

हे देखील वाचा