Thursday, September 28, 2023

पठाण ‘जवान’ झाला! सलमान खानने शाहरुखच्या सिनेमाचा ट्रेलर पाहून केली पोस्ट शेअर म्हणाला…

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘जवान’ सिनेमाबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. शाहरुखच्या ब्लॉकबस्टर अशा ‘पठाण’ सिनेमानंतर सगळ्यांचे लक्ष लागले आहे, ते जवानकडे. जवान सिनेमातील शाहरुखचा पहिला लूक समोर आल्यानंतरच यात प्रेक्षकांना काहीतरी वेगळे नक्कीच पाहायला मिळणार हे नक्की. आता या सिनेमाचा एक छोटा टिझर समोर आला आहे. ज्यात किंग खानचे वेगवेगळे लूक तर दिसत आहेच सोबतच नयनतारा दीपिका आणि इतर कलाकारांचे लूक देखील दाखवण्यात आले आहे. हा दमदार टिझर सध्या सोशल मीडियावर खूपच गाजत आहे. प्रेक्षकांसोबतच कलाकारांनी देखील या टीझरचे कमालीचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अशातच शाहरुख खानचा खूपच जवळचा मित्र असलेल्या सलमान खानने देखील त्याच्या जवानच्या टीझरचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौतुक केले आहे. सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शाहरुख खानच्या जवानचा प्रिव्यू शेअर केला असून, सोबतच त्याचे जोरदार कौतुक केले आहे. सलमान खानने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “पठाण ‘जवान’ झाला. खूपच छान ट्रेलर आहे. मला तर खूप आवडला. हा एक असा सिनेमा आहे, जो आपल्याला चित्रपट गृहांमध्येच पाहिला पाहिजे. मी तर नक्कीच पहिल्या दिवशीच हा सिनेमा जाऊन पाहणार. वा मजा आली.”

दरम्यान ‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलरला केवळ २४ तासांत तब्बल ११२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या सिनेमाआधी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. ‘जवान’ चित्रपटात शाहरुखसोबतच दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार नयनतारा आणि विजय सेतुपती हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोबतच दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसतील.

अधिक वाचा-
प्रिती झिंटाने केले जुळ्या मुलांचे मुंडण, फाेटाे शेअर करत सांगितले विधीचे महत्त्व
राखीने सांगितला 15 दिवसात टोमॅटो पिकवण्याचा भन्नाट उपाय; म्हणाली, ‘सात जन्मासाठी उपयुक्त…’

हे देखील वाचा