Saturday, September 30, 2023

आलिया भट्टने पती रणबीर कपूरला मारली मिठी अन्…, रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. दोघांनी गेल्या वर्षी 14 एप्रिल 2022 रोजी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केले. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहेत. त्यांची ऑफ-स्क्रीन जोडी जितकी हिट आहे, तितकीच 2022 मध्ये त्यांच्या ऑन-स्क्रीन जोडीनेही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.

9 सप्टेंबर 2023 रोजी ‘ ब्रह्मास्त्र पार्ट वन’ रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. या खास प्रसंगी आलिया भट्टने ( Alia Bhatt Video) चित्रपटाच्या सेटवरील एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आलिया आणि रणबीरचे खरे रोमँटिक क्षण पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलियाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. आल्याचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.

आलियाने ‘ब्रह्मास्त्र’च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त सेटवरून तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्यासोबत घालवलेल्या सुंदर क्षणांनी बनलेला आहे. व्हिडिओच्या सुरुवात अयान आणि आलियाने होते, ज्यामध्ये तो अभिनेत्रीला एक सीन समजावून सांगताना दिसत आहे. यानंतर दोघेही मजा करू लागतात. यानंतर आलियाने रणबीरसोबत फर्स्ट लुक टेस्टची झलक दाखवली आहे. आलियाने रणबीरसोबतच्या पहिल्या प्रीप ट्रिपचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही डोंगरावर उभे असताना पोज देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

फ्लाइटमध्ये अयानचा पाय ओढण्यापासून ते रणबीर कपूरसोबत कारमध्ये मस्ती करण्यापर्यंत आणि वाराणसीमध्ये शूटिंगचा एक सुंदर क्षण कॅप्चर करण्यापर्यंत आलिया भट्टने ‘ब्रह्मास्त्र’च्या पडद्यामागील झलक शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या काळजाचा एक तुकडा, विश्वास बसत नाही की पुर्ण एक वर्ष होऊन गेली आहेत. हे प्रेमळ क्षण कायम आठवणीत राहतील.” या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. (Alia Bhatt and Ranbir Kapoor romantic video has gone viral on social media)

अधिक वाचा-
आहा कडकच ना! ‘जवान’मधील ‘तो’ सीन सुरू होताच थेट चित्रपटगृहात तरूणाने केले प्रेयसीला प्रपोज, पाहा व्हिडिओ
ईशा गुप्ताने शेअर केला बिकिनीमधील ‘तसला’ फोटो, चाहतेही झाले आऊट ऑफ कंट्रोल

हे देखील वाचा