Wednesday, June 26, 2024

आतल्या गोटातील खबर! सलमानमुळे ‘हा’ दिग्दर्शक पडणार कठीण काळातून बाहेर, केलीय हातमिळवणी?

ऑगस्ट 2022मध्ये ‘लायगर‘ हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमातून साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. मात्र, हा सिनेमा चांगलाच आपटला. या सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले होते. आता या सिनेमाच्या अपयशानंतर दिग्दर्शक जगन्नाथ बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत सिनेमा बनवण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. अशीही चर्चा आहे की, दिग्दर्शकाने सलमानला एका सिनेमाची स्क्रिप्टही ऐकवली आहे आणि तो या सिनेमात काम करण्यासाठी तयारही आहे. मात्र, याबाबत अधिकृत वक्तव्य समोर आले नाही.

खरं तर, 2009मध्ये सलमान खान (Salman Khan) याचा ‘वाँटेड’ हा सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा महेश बाबू (Mahesh Babu) याच्या ‘पोकिरी’ या सिनेमाचा हिंदी रिमेक होता. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले होते. हा सिनेमा भलताच हिट ठरला होता. अशात सलमानने पुरी जगन्नाथ (Puri Jagannadh) यांच्यासोबत हातमिळवणी केल्याचे वृत्त समोर येत आहे.

पुरी जगन्नाथ आणि सलमान खान यांच्याबाबत सिनेसृष्टीत एक वेगळीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या दोघांनीही मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) या सिनेमात ‘गॉडफादर’ या सिनेमात काम केले होते. या सिनेमात दिग्दर्शक पुरी एका पत्रकाराच्या भूमिकेत होते, तर सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

तब्बल 125 कोटींमध्ये बनलेला ‘लायगर’
पुरी जगन्नाथ आणि सलमान खान यांनी एकत्र काम केले, तर यामुळे टॉलिवूड दिग्दर्शकाला त्याच्या कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत मिळू शकते. कारण, विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) अभिनित लायगर (Liger) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली होती. हिंदी- तेलुगू भाषेतील हा सिनेमा तब्बल 125 कोटी रुपयांच्या किंमतीत बनवला गेला होता. या सिनेमात विजयसोबत प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन, अभिनेत्री अनन्या पांडे यांच्याही भूमिका होत्या. (after liger failure Puri Jagannadh to cast actor salman khan in his next film)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पठाण’ चित्रपटाच्या वादामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ची मध्येच उडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
तेरा घर चला जाएगा! बिग बॉसच्या घरामध्ये गली बॉयने केला पुन्हा एकदा राडा

हे देखील वाचा