Friday, March 29, 2024

तेरा घर चला जाएगा! बिग बॉसच्या घरामध्ये गली बॉयने केला पुन्हा एकदा राडा

बिग बॉस 16 आता अंतिम टप्प्याच्या जवळ आलं आहे त्यामुळे प्रत्येकच स्पर्धक जिंकण्यासाठी काहीही करण्याठी तयार झाले आहेत. गेल्या आठवड्यामध्ये अब्दू रोजिक गेल्यापसून अनेकांना राग आला होता. पण आता त्याच्यामुळे प्रत्येकालाच वाटत आहे की, आता जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येकच स्पर्धक जिवतोड मेहनत करत आहे. सोमवार (दि, 19 डिसेंबर) रोजी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये स्पर्धकांमधील कॅप्टन्सीमुळे धमाकेदार सामना पाहायला मिळाला मात्र, घराचे कॅप्टन सौंदर्या शर्मा, एमसी स्टॅन, आणि श्रिजिता डे यांनीच पटकारली

बिग बॉस 16 (Bigg Boss) सुरु होऊन दोन महिन्याच्यावर दिवस उलटले आहेत आता फक्त थोडाच काळ राहिला आहे. लवकरच बिग बॉस16 चा स्पर्धक आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र, घरामध्ये जसे दिवस कमी होत आहेत तसंच आपल्या नवीन ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. नुकत्यच झालेल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये त्यांची नावे न घेतल्यामुळे काही स्पर्धकांना चांगल्याच मिरच्या झोंबतात.

आता आगामी होणाऱ्या भागामध्ये एक नॉमिनेशन टास्क होणार आहे, ज्यामध्ये शिव ठाकरे (Shiv Thakare), निमरित कौर (Nimrit Kaur), सुंबुल तौकीर (Sumbul Tauqeer), यांनी निशाण्यावर अंकित गुप्ता (Ankit Gupta) आणि प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chara Chudhary) या दोघांना धरले आहे. सगळेजन मिळुन या दोघांना नॉमिनेट करतात मात्र, एसमसी स्टॅन (MC Stan) टीना दत्ता (Tina Dutta) हिला नॉमिनेट करतो. टीना कारण विचारते तेव्हा स्टॅन सांगतो की, टीना पलटली आहे. ती परत आल्यानंतर म्हणाली होती की, शालिनला चांगलच दाखवते पण ती पुन्हा तशीच वागत आहे. मग शालिन भनोट (Shalin Bhanot) म्हणतो की, एवढं का भडकतोस मग स्टॅनला राग येतो आणि म्हणतो की, ‘;चेहऱ्याला हात लावू नको. ‘ तेवढ्यात टीना स्टॅनला म्हणते की, दागिण्यांच्या मागे लपलेला आहेस तु तेव्हा स्टॅन म्हणतो, “दागिण्यांवर जाऊ नको तुझं घर जाईन त्यात.”

 

View this post on Instagram

 

स्टॅनच्या अशा बोलण्यानंतर शालिन आणि स्टॅनमध्ये चांगलाच वाद पेटतो. शालिन स्टॅनला म्हणतो की, “जास्त शाहणपण करु नकोस, तुला समजलं का…” हे बोलताच दोघांमध्ये हाणामारी होते सुरु होते आणि बाकीचे स्पर्धक दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राजामौलींमुळे चित्रपटसृष्टीची नासाडी? बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्रीने ‘आरआरआर’ चित्रपटावर केली टिका

‘प्रत्येकाला स्वतःचे हक्क…’, मिलिंद सोमनने 14 वर्षापूर्वीच्या अनुभवानुसार ‘पठाण’ चित्रपटावर व्यक्त केले मत

हे देखील वाचा