Saturday, March 2, 2024

प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता! आगामी नवीन चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीझ

आपला सर्वांचा लाडका ‘ बाहूबली ‘ वेगवेगळ्या विषयांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मध्यंतरी त्याच्या सालार या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर भरभरुन कमाई केली होती. त्यानंतर तो चर्चेत होता ‘ द गोट लाइफ ‘ च्या पोस्टर रिलीजमुळे तर अगदी दोन दिवसांपुर्वी त्याने ‘कल्कि 2898 एडी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असल्याची कल्पना चाहत्यांना दिली होती. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत ‘कल्कि 2898 एडी’ 9 मे 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही जाहीर केलं होतं. परंतु आज पुन्हा एकदा सोशल मिडीयावर त्याच्या चर्चेला उधान आलंय. याला कारंणही तसंच आहे.

आगामी चित्रपटाचा फस्ट लुक आला समोर
आज सकाळी प्रभासने एक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट सोशल मिडीयावर भलतीच वायरल होतेय. ही पोस्ट आहे प्रभासच्या आगामी चित्रपटाची. मरुती (Maruthi) दिग्दर्शित प्रभासच्या या पॅन-इंडिया प्रोजेक्टची चाहत्यांना कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा होती. संक्रांतीच्या शुभमुहुर्तावर प्रभासने या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा फस्ट लुक रिलीज केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘द राजा साब’ असल्याचेही समोर आले आहे.ही पोस्ट टाकताना त्याने कॅप्शनमध्ये असं लिहीलं आहे की, ” या सणाला ” द राजा साब ” (The Raja Saab First look) चा फस्ट लुक सादर करत आहे” यावेळी त्याने चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा देत सर्वांना आनंद लाभो अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे.

या पोस्टरमध्ये अभिनेता काळा शर्ट, लुंगी, फ्लिपफ्लाॅप आणि दाढी अशा पेहरावात दिसत आहे. त्याचसोबत पोस्टरमध्ये बॅकग्राउंडला फटाक्याचे कागद आणि जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. यावरुन प्रभास एका जबरदस्त भुमिकेत दिसणार असल्याचे अंदाज चाहते बांधत आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याला दमदार पद्धतीने सादर केल्याबद्दल चाहते टीमचे कौतुकही करत आहेत.

प्रभासचा चित्रपट ठरला होता 2023 चा हिट
2023 मध्ये प्रभासचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. यात पौराणिक कथेवर आधारित आदिपुरुष (Adipurush), बाॅक्स ऑफिसवर थोडा डगमगला तर वर्ष सरताना सल्लारने(Sallar) बाॅक्स ऑफिसवर भरगोस कमाई केली. आणि भारतातील वर्षभरात हीट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला. यानंतर प्रभास मे 2024 ला प्रदर्शित होणाऱ्या ‘कल्कि 2898 एडी'(Kalki 2898 AD) या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हा एक भव्य साय-फाय सिनेमा असणार आहेे. याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच त्याने त्याच्या पुढच्या ‘द राजा साब’ या प्रोजेक्टची घोषणा केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘ऍनिमल माझ्या टाइपची फिल्म नाही’,कोंकणा सेन शर्माचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
सहपत्नी शरद पवारांनी पाहिला ‘सत्यशोधक’ चित्रपट, थिएटरमधून बाहेर येताच राज्य सरकारला केली ‘ही’ विनंती

 

 

 

हे देखील वाचा