Tuesday, June 18, 2024

वैभवी उपाध्यायच्या निधनानंतर होणाऱ्या पतीने शेअर केली भावुक पोस्ट म्हणाला, “मला रोजच्या प्रत्येक मिनिटाला…”

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या शोमध्ये चमेलीची भूमिका करून घराघरात स्वच:ची ओळख निर्मान करणारी अभिनेत्री वैभवी उपाध्यायने वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात अभिनेत्री वैभवीचा मृत्यू झाला. या बातमीने वैभवीचे कुटुंबीय, इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी जय गांधीने वैभवीची आठवण करून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jay Gandhi (@jaygandhi.6)

वैभवी (Vaibhavi Upadhyay) आणि जय (Jay Gandhi) हे दोघेही या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार होते. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. या घटनेने वैभवी जय आणि त्याच्या कुटुंबापासून कायमची दुरावली आहे. जयने नुकतीच वैभवीच्या स्मरणार्थ इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जे पाहून सर्वांचे डोळे ओलावतील. ही पोस्ट पाहून चाहते अभिनेत्री वैभवीला मिस करत आहेत.

वैभवीला गमावल्यानंतर जय उद्ध्वस्त झाला आहेत. तो अजूनही तो या दुःखद बातमीवर मात करू शकत नाही. पोस्ट करताना त्याने लिहिले की, “मला रोजच्या प्रत्येक मिनिटाला तुझी आठवण येते, तू नेहमी माझ्या हृदयात राहशील, तुला कधीच विसरणार नाही, खूप लवकर निघून गेली,RIP मेरी गुंडी.., मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.”

त्याच्या या पोस्टवर चाहत कमेंट करत आहेत. अनेकांना वैभवीला श्रद्धांजली वाहिली. वैभवीसाठी ही भावुक पोस्ट केल्यावर जयने काही वेळातच आपले इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केले. तसेच माध्यमातील वृत्तानुसार, वैभवीचे कुटुंब तिच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी लवकरच गुजरातला जाणार आहे.

विशेष म्हणजे जय आणि वैभवी हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टीसाठी गेले होते. त्यानंतर त्यांची कार ट्रकला धडकली. वैभवीच्या डोक्याला दुखापत झाली. ती कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहिली पण तिची कार खड्ड्यात पडली. त्यामुळे तिचे 22 मे रोजी तिचे निधन झाले. (After the death of Vaibhavi Upadhyay, the husband made an emotional post)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
“जेव्हा कागद पेन नसते, तेव्हा काही…” अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
“जास्तीत जास्त वेळ घालवायचा…सोपं नव्हतं…”; ‘आई’ असलेल्या मधुराणी गोखलेची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा