Thursday, September 28, 2023

‘मैं पुण्य हूं या पाप हूं… नाम तो सुना होगा’, शाहरुख खानच्या ‘जवान’चा अ‍ॅक्शन-पॅक्ड दमदार ट्रेलर रिलीज

शाहरुख खानच्या ‘जवान‘ या चित्रपटाचा प्रिव्ह्यू सोमवारी (10 जुलै)ला रिलीज झाला आहे. ‘पठाण’नंतरचा किंग खानचा या वर्षातील हा दुसरा चित्रपट आहे. ‘पठाण’ सुपरहिट झाल्यानंतर चाहते ‘जवान’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. लोक चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरसाठी प्रचंड उत्साही आहेत. अशात निर्मात्यांनी चाहत्यांना एक प्रीव्यू भेट दिली आहे.

शाहरुख खान (shah rukh khan) याच्या ‘जवान’ या चित्रपटाचा प्रिव्ह्यू अॅक्शन पॅक आहे. प्रिव्ह्यूची सुरुवात शाहरुख खानच्या आवाजाने होते. ज्यामध्ये तो म्हणतो, ‘मी कोण आहे हे मला माहीत नाही, माझा कोणताही हेतू नाही. स्वतःला विचारा की, मी पुण्य आहे की पाप आहे. कारण, मी देखील तू आहेस.”

प्रिव्ह्यूमध्ये, विजय सेतुपती, नयनतारा आणि दीपिका पदुकोण देखील अॅक्शन सीन करताना दिसत आहेत. या चित्रपटात दीपिका गेस्ट अपीयरेंस करत आहे. यामध्ये शाहरुख खानचाही वेगळा लूक पाहायला मिळत आहे.

 

चित्रपटाचे दिग्दर्शक ‘एटली’ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रिव्ह्यूची घोषणा केली आणि लिहिले, ‘जवान प्रिव्ह्यूचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. जवानचा ट्रेलर ‘टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल: द रेकनिंग रे’ या चित्रपटासोबत चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Atlee (@atlee47)

या वर्षी मे महिन्यात चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. या अपडेटची घोषणा मोशन पिक्चरसह करण्यात आली. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. गौरी खानने याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट यापूर्वी या वर्षी 2 जून रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर त्याची रिलीज डेट वाढवण्यात आली.(bolywood movie jawan revue releases on monday staring shah rukh khan nayanthara vijay sethupathi )

अधिक वाचा-
शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा