विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आपल्या दमदार अभिनयाने आणि संदरतेने बॉलिवूडच नाही तर हॉलिवीडमध्ये आपली छाप सोडली आहे. अभिनेत्री जेवढी आपल्या अभिनयासठी ओळखली जाते, तेवढीच आपल्या वैयक्तीक आयुष्यासाठी देखिल चर्चे असते. तिचे आणि सलमान खान याचे नाते आख्या इंडस्ट्रीमध्ये गाजले होते. यानंतर अभिनेत्रीचे नाव विवेक ओबेरॉय सोबत जोडले गेले. याच्याही नात्याच्या अनेक चर्चा उठल्या होत्या. मात्र, या दोघांमध्ये अभिनेत्रीमुळे जाम वाद पेटला. यानंतर ऐशर्याने अभिषेक बच्चन सोबत लग्न करुन बॉलिवूड इंडस्ट्रीला आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, असेही म्हणले जात आहे की, अभिषेक बच्चनपूर्वीही अभिनेत्रीचे लग्न झाले होते.
बॉलिवूडची अभिनेत्री विश्वसुंदरी आणि बच्चन कुटुंबाची सुन ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही आज आपला 49 वा वाढदिवस साजरी करत आहे. ती सोमवारी (दि.31 ऑक्टोंबर) दिवशीच मुलगी आराध्यासोबत वाढदिवस साजरी करण्यासठी मुंबईमध्ये परतली आहे. ऐशवर्याला आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे इंडस्ट्रीमध्ये खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लगला होता. तिचे नाव अभिनेता सलमान (Salman Khan) खान आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्या नावाशी सतत जोडले जायचे मात्र, तुम्हाला माहित आहे का, अभिनेत्रीचे अभिषेक पूर्वी देखिल पहिले लगन झाले आहे.
ऐश्वरया राय बच्चन ही बॉलिवूडचे शेहंशाह अमिताभ बच्चन यांच्या घराण्याची सुन होणार होती. त्यामुळे अनेक लोकांचे लक्ष फक्त यांच्या लग्नाकडेच टिकूण राहिले होते. 2007 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जुहू बंगल्यामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा लग्न सोहळा पार पडला. लग्नाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी मीडियासोबतच चाहतेही खूपच उत्सुक होते, तेव्हा एक महत्वाची बातमी समोर आली. अभिनेत्रीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आढळल्यामुळे अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी पिंपळाच्या झाडासोबत तिचे लग्न करण्यात आलं. त्यामुळे अनेक ठिकाणी तिला या प्रश्नाचा सामना करावा लागला होता.
अभिनेत्रीने एका मुळाखतीदरम्यान सांगितले की, “हो माझं लग्न पिंपळाच्या झाडाशी झालं होतं, पण ही अफवा सगळीकडे पसरवू नका,” असं तिने ठणकावून सांगितलं होतं. अभिषेक असो किंवा अमिताभ बच्चन यांनी नेहमी हे लग्न अफवा असल्याचे सांगितले. यावर अमिताभ यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, आम्ही अंधश्रद्धेला चालना देत नाहीत. शिवाय ऐश्वर्या आणि अभिषेकचं लग्न करण्याचं ठरलं तेव्हा आम्ही तिची कुंडलीही पाहिली न्हवती. तर अभिषेक बच्चनने थेट सोशल मीडियालर प्रश्न केला होता की, “मी ते झाड शोधत आहे, ज्या झाडाशी ऐश्वर्या रायचं लग्न झाले होतं.”
माध्यमातील वृत्तानुसार यांच्या लग्नाविषयी अजून एक गोष्ट समोर आली होती ती, म्हणजे ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे लग्न वाराणसीमधील शिव मंदिरमध्येही झाले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘वयाच्या 12 व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, अभिनेत्री केला मोठा खुलासा
शरीराच्या ‘या’ आजारामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती इलियाना डिक्रूझ, आत्महत्येचाही करायची सतत विचा