Monday, January 19, 2026
Home कॅलेंडर बाबो! लग्नात तब्बल ‘इतकी’ महागडी साडी घालून नवरी बनली होती बच्चन कुटूंबाची लाडकी सूनबाई

बाबो! लग्नात तब्बल ‘इतकी’ महागडी साडी घालून नवरी बनली होती बच्चन कुटूंबाची लाडकी सूनबाई

बच्चन कुटूंबाची लाडकी सूनबाई म्हणजेच ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आपल्या स्टायलिश राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. ऐश्वर्याच्या महागड्या साड्यांची, दागिन्यांची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) लग्नाचीही जोरदार चर्चा त्या काळात रंगली होती. मात्र सगळ्यात जास्त चर्चा झाली, ती लग्नात ऐश्वर्याने घातलेल्या साडीची! १५ वर्षापूर्वी ऐश्वर्याने घातलेल्या साडीची किंमत ऐकून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. नेमकी किती होती किंमत आणि काय होती त्या साडीची खासियत चला जाणून घेऊ…

विश्वसुंदरी ऐश्वर्या रायच्या सौंदर्याच्या जादूने ९०च्या दशकात अवघी सिनेसृष्टी घायाळ झाली होती. त्या काळात प्रत्येक अभिनेता ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. म्हणूनच ऐश्वर्याचं नाव अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडलं गेलं होतं. अगदी सुपरस्टार सलमान खानपासून (Salman Khan) विवेक ऑबरॉयपर्यंत (Vivek Oberoy) अनेकजण ऐश्वर्यासाठी वेडे झाले होते. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. शेवटी ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २००७ मध्ये पार पडलेला हा शाही विवाहसोहळा अत्यंत झगमगाटात पार पडला होता. या लग्नसोहळ्याची आजही चर्चा केली जाते, कारण हा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा विवाह सोहळा मानला जातो.

या शाही विवाहसोहळ्यासाठी निवडक पाहुण्यांना आमंत्रित केले गेले होते. यावेळी सगळ्यात चर्चा झाली ती ऐश्वर्याने घातलेल्या साडीची. यावेळी ऐश्वर्याने सोनेरी कांजीवरम साडी घातली होती. या साडीची खासीयत म्हणजे तिला सोन्याच्या धाग्याने विणण्यात आले होते. त्यावर अनेक क्रिस्टलही लावण्यात आले होते. या साडीवर घातलेल्या दागिण्यांमुळे ऐश्वर्या खूपचं मनमोहक दिसत होती. फॅशन डिझायनर नीता लुल्लाने तिचा हा लूक केला होता. या चर्चित साडीची किंमत तब्बल ७५ लाख एवढी होती. म्हणूनच ही आत्तापर्यंतची महागडी साडी समजली जाते. या लग्नात अभिषेकने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. त्याला ही सोन्याची किनार लावण्यात आली होती.

Photo Courtesy: Social media

दरम्यान अभिषेकने ऐश्वर्याला ‘गुरु’ चित्रपटावेळी लग्नाची मागणी घातली होती. यावेळी दोघेही न्युयॉर्कमध्ये शूटिंग करत होते. ऐश्वर्याने २०११ मध्ये आराध्याला जन्म दिला.

हेही वाचा :

हे देखील वाचा