बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात लग्नासोहळ्याची धूम सुरू आहे. अनेक कलाकार आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधताना दिसत आहे. ‘गुम है किसी के प्यार में’ मधील विराट आणि पत्रलेखा म्हणजेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माही लग्नबंधनात अडकणार आहेत. या मालिकेत नील आणि ऐश्वर्या भावजय आणि मेव्हणीच्या भूमिकेत आहेत. पण खऱ्या आयुष्यात दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता दोघेही नव्याने आयुष्य सुरू करणार आहेत. उज्जैनमध्ये दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून, याचे फोटोही व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे.
समोर आले हळदी समारंभाचे फोटो
नुकताच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांचा हळदी समारंभ पार पडला. यादरम्यान कुटुंबीय आणि मित्रांनी मिळून नील आणि ऐश्वर्याला हळद लावली. दोघांचे काही फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये नील आणि ऐश्वर्या हळदीने माखलेले असून, आपल्या मित्रांसोबत फोटोसाठी पोझ देत आहेत. (aishwarya sharma and neil bhatt wedding see mehndi and haldi ceremony pictures)
मेहंदी सोहळ्यातही झाली धमाल
या अगोदर नील आणि ऐश्वर्याचा मेहंदी सोहळाही पार पडला, ज्याचे देखील फोटो समोर आले आहेत. स्वतः ऐश्वर्याने तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नववधू तिची मेहंदी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, ऐश्वर्या शर्मा तिच्या कुटुंबासोबत कशाप्रकारे मेहंदी सोहळा एन्जॉय करत आहे. त्याच वेळी, शेवटच्या फोटोमध्ये ती एखाद्या नवरीप्रमाणे तिच्या मेहंदीसह पोझ देताना दिसत आहे. मेहंदी सोहळ्यात, ऐश्वर्या शर्माने सुंदर हिरव्या रंगाचा प्लाझो आणि कुर्ती परिधान केली आहे, या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
व्हायरल झाला झाला रोमँटिक व्हिडिओ
याआधी ऐश्वर्या शर्माने नील भट्टसोबतचा तिचा एक रोमँटिक व्हिडिओही शेअर केला होता, ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. हा व्हिडिओ त्यांच्या प्री वेडिंग शूटचा आहे, ज्याच्या बॅकग्राउंडमध्ये बॉलिवूड गाणी वाजत आहेत, तर ऐश्वर्या आणि नील त्याच्यावर रोमँटिक सीन क्रिएट करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री
-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती