[rank_math_breadcrumb]

कथा अजून संपलेली नाही…’अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची अधिकृत घोषणा; जाणून घ्या रिलीज डेट

अजय देवगण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एक नवी गूढ गाठ घेऊन येत आहेत. ‘दृश्यम 3’ची आज अधिकृत घोषणा करण्यात आली असून, निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

निर्मात्यांनी नुकताच प्रदर्शित केलेला १ मिनिट १३ सेकंदांचा व्हिडिओ प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवणारा आहे. या व्हिडिओमध्ये अजय देवगणचा (Ajay Devgn)दमदार आवाज ऐकायला मिळतो, ज्यामध्ये तो कुटुंबाच्या महत्त्वावर भाष्य करतो. आतापर्यंतच्या कथेची झलक दाखवताना विजय साळगावकर हे पात्र ठामपणे म्हणते, “माझं सत्य, माझा हक्क… फक्त माझं कुटुंब आहे.” या संवादातून विजय साळगावकर आपल्या कुटुंबासाठी भक्कम भिंतीसारखा उभा असल्याचे स्पष्ट होते. व्हिडिओच्या शेवटी तो म्हणतो, “कथा अजून संपलेली नाही… शेवटचा भाग अजून यायचा आहे,” आणि याच एका वाक्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते.

‘दृश्यम ३’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, याचे दिग्दर्शन अभिषेक पाठक करत आहेत. चित्रपटाच्या कलाकारांबाबत सध्या फारशी माहिती समोर आलेली नसली, तरी कथा मागील भाग जिथे संपली होती, तिथूनच पुढे सुरू होणार असल्याची अपेक्षा आहे. यावेळी कलाकारांमध्ये काही बदल होतील का आणि अक्षय खन्ना पुन्हा झळकणार का, याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, ‘दृश्यम’ हा मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये आलेल्या ‘दृश्यम २’ नेही प्रेक्षकांची मने जिंकली आणि चांगली कमाई केली. आता चार वर्षांनंतर निर्माते तिसरा भाग घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मोहनलाल यांनी मल्याळम ‘दृश्यम ३’ च्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे मूळ मल्याळम आवृत्तीचा हिंदी व्हर्जनवर काय परिणाम होईल आणि अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ मध्ये कथेत काही बदल होतील का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

धुरंधर’च्या यशानंतर; नववर्षाच्या सुट्टीसाठी रणवीर सिंग दीपिकासोबत एअरपोर्टवर स्पॉट