×

किच्चा सुदीपच्या ‘राष्ट्रभाषा’ वक्तव्यावर भडकला अजय देवगण; म्हणाला, ‘तुम्ही चित्रपट हिंदीत का डब करता?’

सध्या देशभरात दाक्षिणात्य चित्रपटांचा जोरदार बोलबाला पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक येणाऱ्या दमदार दाक्षिणात्य चित्रपटांमुळे सध्या सगळीकडे टॉलिवूडच्या चित्रपटांचे कौतुक केले जात आहे. ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि आता सिनेमागृहात धुमाकूळ घालत असलेल्या ‘केजीएफ २’मुळे प्रेक्षकांंना दाक्षिणात्य सिनेसृष्टीचेच वेड लागले आहे. याच कारणाने सध्या बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये जोरदार चढाओढ सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच कलाकारांमध्येही चांगलेच खटके उडत आहेत. काही दिवसांपूर्वी कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपने (Kichha Sudeep) हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिली नसल्याचे विधान केले होते. त्याच्या या विधानाला अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgn) कडक शब्दात उत्तर दिले आहे. 

दाक्षिणात्य सुपरस्टार सुदीप एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला, “हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे. अनेक बॉलिवूडमधील निर्माते दिग्दर्शक तेलुगू, तामिळमध्ये चित्रपट डब करत आहेत. पण त्यांना त्यातून हे तितकं यश मिळत नाही आणि त्याउलट आज आम्ही सर्वत्र चालणारे चित्रपट बनवत आहोत.” असे स्पष्ट मत त्याने या कार्यक्रमात व्यक्त केले होते. आता सुदीपच्या याच वक्तव्याचा बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणने संताप व्यक्त केला आहे.

याबद्दल ट्वीट करताना अजय देवगण म्हटला की, “किच्चा सुदीप, तुझ्या मतानुसार, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाहीये तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का रिलीझ करता? हिंदी आमची मातृभाषा व राष्ट्रभाषा होती व नेहमी राहील.”

अजय देवगणच्या या ट्वीटलाही अभिनेता सुदीपने उत्तर देताना “मी ते वाक्य वेगळ्या अर्थाने बोललो होतो कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आपली भेट झाल्यानंतर याबद्दल सविस्तर बोलूया” असे म्हणत या सगळ्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या दोन्ही दिग्गज कलाकारांमध्ये रंगलेल्या ट्विटर वॉरची सगळीकडेच चर्चा सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post