पांढरी दाढी अन् वेगळ्याच लुकमध्ये दिसला बॉलिवूडचा ‘सिंघम’; हटके लूक होतोय तुफान व्हायरल


कलाकार त्यांच्या चित्रपटांसाठी नेहमीच स्वतःच्या लूकवर, वेषभूषेवर नेहमी प्रयोग करत असतात. यासाठी ते खूप मेहनत घेतात. कलाकारांचे नवनवीन लूक फॅन्समध्ये देखील हिट होताना दिसतात. वजन, केस वाढवणे, वजन, केस कमी करणे, आदी अनेक विविध प्रयोग ते स्वतःवर करतात. जेव्हा कलाकारांचे असे नवीन लूक सर्वांसमोर येतात, तेव्हा ते कलाकार आणि त्यांचे लूक नेहमी चर्चेचा विषय बनतो.

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण सध्या नुकताच मीडियामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. अजयने त्याच्या संपूर्ण सिनेकरियरमध्ये एक से बढकर एक सिनेमे दिले आहेत. अगदी ऍक्शन पासून, हॉरर, कॉमेडी सर्वच प्रकारच्या चित्रपटांमध्ये त्याने स्वतःला हुकमाचा एक्का सिद्ध केले आहेत. सध्या सोशल मीडियावर अजयचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अजयचा लूक अतिशय वेगळा आणि हटके दिसत आहे. अजयचा हा नवा लूक पाहून त्याच्या फॅन्ससोबतच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अजयचा सध्या व्हायरल होणारा नवा लूक जर आपण पाहिला तर यामध्ये तो पांढऱ्या दाढीमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये अजय नेहमीसारखाच हँडसम आणि डॅशिंग दिसत आहे. त्याच्या या लूकवर फॅन्स त्याचे खूप कौतुक करताना दिसत असले, तरी काही फॅन्स त्याच्या या पांढऱ्या दाढीबद्दल चिंता देखील व्यक्त करत आहेत. तर काही फॅन्सला हा नक्कीच अजयच आहे ना असा प्रश्न देखील पडला आहे. अनेकांनी त्याचा हा लूक त्याच्या आगामी सिनेमासाठी असल्याचे सांगितले आहे.

अजयचा ‘थँक गॉड’ नावाचा एक सिनेमा येत आहे, यात सिद्धार्थ मल्होत्रा देखील असणार आहे, त्याच्यासाठीच हा लूक असल्याचे सांगितले जात आहे.

अजय हा असा अभिनेता आहे, जो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडत असतो. ९०च्या दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अजय आजही तुफान लोकप्रिय आहे. अजय नेहमी वेगवेगळे लूक ट्राय करताना दिसतो आणि सर्वच लूकमध्ये तो प्रसिद्ध होतो.

येत्या १३ ऑगस्टला अजयचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी थाटला तिने संसार; तर १७ व्या वर्षी उर्वशी ढोलकिया बनली होती दोन जुळ्या मुलांची आई

-जेव्हा विवाहित गुरू दत्त पडले होते वहिदा रहमान यांच्या प्रेमात; अजूनही उलगडलं नाही त्यांच्या मृत्यूचं रहस्य

-चित्रपटसृष्टीत येण्यासाठी संजीव कुमार यांनी लपवले खरे नाव; तर ‘या’ कारणामुळे नुतनने मारली होती त्यांच्या कालशिलात


Leave A Reply

Your email address will not be published.